PornStars नी नॅशनल पार्कमध्ये शूट केले ‘तसले’ व्हिडिओ ! आता होतेय कारवाईची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   काही अ‍ॅडल्ट स्टार्सनी मेक्सिकोमध्ये नॅशनल पार्कमधील ग्रिजाल्वा नदीजवळ काही व्हिडिओ शूट केलं आहे. याच कृत्यामुळं हे पॉर्नस्टार चर्चेत आले आहेत. कारण आता त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

अलेक्स मरीन, मिया मरीन, जिजेल मोंटेस आणि यामीलोथ रामिरेज या 4 पॉर्नस्टार्सनी गेल्या महिन्यात काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

या स्टार्सनी सोशल मीडियावर पोस्टदेखील शेअर केली होती. यात त्यांनी लिहिलं होतं की, हाय फ्रेंड्स आम्ही केनयॉनला जात आहोत. आम्ही अशा लोकेशन्सवर व्हिडिओ फोटो शूट करणार आहोत, ज्या जागा तुम्ही कधीच बघितल्या नसतील असं त्यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे या प्रदेशात दुर्मिळ जातीचे काही प्राणीदेखील आढळतात.

यानंतर या पॉर्नस्टार्सनी तिथे जाऊन काही आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले आहेत. आता एका संस्थेनं याबद्दल कारवाईची मागणी केली आहे. नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्टेड नॅचरल एरिया असं कारवाईची मागणी करणाऱ्या संस्थेचं नाव आहे. ही संस्था या परिसराची देखभाल करते. या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी या संस्थेनं केली आहे.

नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्टेड नॅचरल एरिया या संस्थेनं आरोपात म्हटलं आहे की, या अॅडल्ट स्टार्सनी शांततेचा भंग केला आणि इथं येऊन असभ्य वर्तन केलं. त्यामुळं या पॉर्नस्टार्सवर लवकरच कारवाई करा, अशी मागणी ही संस्था करत आहे.

दुसरीकडे तिकडच्याच एका अधिकाऱ्यानं असंही सांगितलं की, या व्हिडिओमुळं इथं येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. कोरोनामुळं गेले काही महिने इथल्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला होता.