अश्लील व्हिडीओ प्रकरण : ‘पती-पत्नी और वो’ तिघेही ‘गोत्यात’, तक्रारदार महिला आणि आरोपी भाजपचे माजी पदाधिकारी

पोलिसनामा ऑनलाईन : हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील भाजपचे माजी नेते आणि काही माजी (BJYM ) पदाधिकाऱ्यांचा अश्लिल व्हिडिओ (MMS Leak ) प्रकरणात पोलिसांनी महिला, बीजेवायएमचे माजी अधिकारी आणि त्याची पत्नी यांना अटक केली आहे. याप्रकरणी फिर्यादीसह पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अश्लील व्हिडिओमध्ये सहभागी असलेल्या बीजेवायएमच्या माजी अधिकाऱ्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. आपापसांत व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

दहा जणांवर खटला

नष्ट केले गेलेले पुरावे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी पुन्हा प्राप्त करून आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणात आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची माहिती देतानापोलीस अधीक्षक कुल्लू गौरव सिंह म्हणाले की, अश्लील व्हिडिओ बनवून तो सार्वजनिक करण्यासंदर्भात ही अटक करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत मिळालेल्या माहिती नुसार , हे प्रकरण मागच्या महिन्यात घडले आहे. अश्लील व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर दोन्ही आरोपी यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर खुप व्हायरल झालेला. १२ मिनिटांचा हा व्हिडीओ एखाद्या सरकारी अतिथी ग्रहावर तयार केला गेला होता. यानंतर BJYM पदाधिकाऱ्यांची पत्नी आणि महिलेचा ऑडिओ सुद्धा व्हायरल झाला होता.

नष्ट केलेले पुरावे मिळवण्यात यश

पोलीस अधीक्षक कुल्लू गौरव सिंह म्हणाले कि, हा अश्लील व्हिडिओ तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविला होता, लॅबच्या अहवालानुसार नष्ट केले गेलेले पुरावे परत मिळवून त्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. अश्लील व्हिडिओ तयार करून तो आपापसांत शेअर केल्याबद्दल आता तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आले आहे. सिंह म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणात नष्ट झालेल्या पुराव्यांचा कसून अभ्यास केला आहे. आणि पोलीस आता निष्कर्षांपर्यंत पोहोचले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –