फॅन असल्याचे सांगून लेखिकेला पाठवले अश्लील व्हिडीओ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फॅन असल्याचे सांगत फेसबुकवर मैत्री करून मेसेंजरवर अश्लील व्हिडीओ पाठवून लेखिकेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लेखिकेने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. लेखिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश देशमुख (अमरावती) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक एस. एस. खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. फेसबुकवर राजेश देशमुख याने त्यांचा फॅन असल्याचे सांगत संपर्क साधला. त्यानंतर त्यांना पुस्तके पाठवून देण्याची विनंती केली. त्यांनीही आपल्या लिखाणाचा चाहता असल्याने त्याला पुस्तके पाठवली. त्यानंतर तो फेसबुकवर त्यांच्याशी बोलू लागला. काही दिवसांनी फेसबुक मेसेंजरवर त्याने ‘हाय ब्युटीफुल’ असा मेसेज पाठवला. त्यांनी त्याकडे दूर्लक्ष केले आणि तो मेसेज डिलिट केला. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांना फेसबुक मेसेंजरवर एक अश्लील व्हिडीओ पाठवला. या व्हिडीओनंतर लेखिकेने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक एस. एस. खटके यांनी दिली.

You might also like