Porn वेबसाइट्स ‘बॅन’, शौकिनांनी शोधला ‘जुगाड’

मुंबई : वृत्तसंस्था – इंटरनेटवर पॉर्न वेबसाईट बॅन करणं सरकारसाठी एक आव्हानच आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारने Pornhub सह 857 पॉर्न साइट्स बॅन केल्या. सरकारच्या या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी टीका केली. पण पाहणाऱ्यांनी आता नवा जुगाड शोधून काढला असून व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क (VPN) द्वारे या साईट्स अ‍ॅक्सेस करण्याचे प्रमाण तब्बल 400 टक्क्यांनी वाढले आहे.

पाहणाऱ्यांनी शोधला जुगाड
पॉर्न साईट्सवर बॅन लागू झाल्यानंतर रिलांयस जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियासह अन्य टेलिकॉम कंपन्यांनी पॉर्न साइट्सचा अ‍ॅक्सेस युजर्ससाठी बंद केला. तर युजर्सनी फक्त सोशल मीडियावर या निर्णयाची टीका केली नाही तर VPN, प्रॉक्सी आणि अन्य टुल्सद्वारे बॅन वेबसाइट्सचा वापर सुरु केला आहे.

बॅन वेबसाईट्सचा अ‍ॅक्सेस वाढला
मोबाईलमध्ये व्हीपीएन अ‍ॅप्स डाऊनलोड करुन बॅन वेबसाईट्सचा अ‍ॅक्सेस करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे प्रमाण तब्बल 405 टक्के आहे. व्हीपीएनचा वापर करणाऱ्यांची संख्या देशात 5 कोटी 70 लाखापर्यंत पोहचली आहे. ही आकडेवारी लंडनमधील एका व्हीपीएन रिव्ह्यू फर्म Top10VPN ने जारी केली आहे.

व्हीपीएन डाऊनलोड करण्याच्या प्रमाणात वाढ
अहवालानुसार बॅन लागू झाल्यानंतर व्हीपीएन सर्चमध्ये अचानक वाढ झाली. ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान मोबाईल व्हीपीएन डाऊनलोड करण्याची सरासरी वाढली असून प्रतिमहिना 66 टक्के लोक हे अ‍ॅप डाऊनलोड करत आहेत.

व्हीपीएनची मोफत सेवा
भारतामध्ये व्हीपीएन सेवा मोफत आहे. हे अ‍ॅप युजर्सचा डेटा विकून पैसे कमवतात. देशात 1 कोटी 10 लाख युजर मोफत टर्बो व्हीपीएनचा वापर करतात. तर 70 लाख युजर सोलो व्हीपीएन आणि हॉटस्पॉट शील्ड फ्रीचा वापर करतात.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like