Pornographic Content | शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने फसवणुकीच्या केसमध्ये दिल्ली पोलिसांकडे मागितला ATR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Pornographic Content | अश्लील कंटेट बनवणे आणि विकण्याच्या प्रकरणात (making and selling pornographic content) अडकलेला राज कुंद्रा (Raj Kundra) आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) च्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. दिल्लीच्या एका व्यापार्‍या (Delhi businessman) ने केलेल्या फसवणुकीच्या आरोपाच्या तक्रारीवर सुनावणी करून दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने (Delhi Rohini court) दिल्ली पोलिसांना आरोपीविरूद्ध अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट दाखल करण्यास सांगितला आहे.

रोहिणी कोर्टच्या मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट मानसी मलिक (Metropolitan Magistrate Mansi Malik) यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांना निर्देश दिले आहे की, त्यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा
पती राज कुंद्राच्या विरोधात एका गुंतवणुकदारासोबत केलेल्या पैशांच्या फसवणुकीच्या
आरोपाबाबत कोर्टात अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट (ATR) दाखल करावा.

याचिकाकर्ता विशाल गोयल (Petitioner Vishal Goyal) यांनी कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला आहे की, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी फसवणुक करून 2018 मध्ये आपल्या कंपनीची भलावण करत कटकारस्थान करून त्यांना कंपनीत 41 लाख रुपयांची (Rs 41 lakh) गुंतवणूक करायला सांगितली.

याचिकाकर्त्याचा आरोप आहे की, कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने म्हटले होते की, त्यांची कंपनी टेक्नोलॉजी
आणि ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये बिझनेस करते, परंतु इन्व्हेस्टमेंट करूनही कोणताही रिटर्न दिला गेला नाही आणि पैशांचा वापर वैयक्तिक फायदे आणि बेकायदेशीर हालचालींसाठी करण्यात आला.

गुंतवलेल्या पैशांतून ब्लू फिल्म (blue film) बनवल्याचा आरोप!

याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, आरोपी आणि कंपनीच्या बिझनेस पॅटर्नबाबत केलेल्या दाव्यांवर विश्वास ठेवून त्याने कंपनीत 41 लाख रुपयांची गुंतवणूक केली.
परंतु नंतर मीडिया रिपोर्ट वाचल्यानंतर जाणवले की, त्याची फसवणूक करण्यात आली आहे आणि त्याच्या पैशांचा वापर ब्लू फिल्म बनवण्यासाठी केला गेला.

 

याचिका दाखल करून मागणी करण्यात आली आहे की, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या विरूद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरूद्ध एखाद्याने फसवणुकीची केस दाखल करण्याची ही पहिली वेळ नाही.
राज कुंद्रा अश्लील कंटेट बनवणे आणि विकण्याच्या प्रकरणात अडकल्यानंतर गुजरातच्या
एका उद्योगपतीने सुद्धा मुंबई पोलिसांकडे आपली तक्रार नोंदवली होती.
ज्यामध्ये तक्रारदाराने दावा केला होता की, राज कुंद्राच्या कंपनीने त्यांना ऑनलाइन क्रिकेट
स्किल-बेस्ट गेमचा डिस्ट्रिब्यूटर बनवण्यासाठी सुमारे 3 लाख रुपयांना चूना लावला.

याशिवाय शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा यांच्यावर कोट्यवधी रूपयांची फसवणूक
केल्याचा आरोप झालेला आहे.
दोघींविरूद्ध लखनऊच्या एका पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला होता.
सध्या, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Web Title : Pornographic Content | shilpa shetty and raj kundra in trouble delhi court sought atr from delhi police in fraud case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sangli Crime | सांगलीत हत्याराची तस्करी करणार्‍या टोळीला अटक; 3 पिस्तूल, 6 जिवंत काडतुसे जप्त

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार

Gold Price Today | सोनं मिळतंय 10000 रुपये ‘स्वस्त’, गुंतवणुकीची चांगली संधी; पहा 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर