महिलेचा चेहरा वापरून अश्लील फोटो

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – फोटोमध्ये छेडछाड करुन एका महिलेचा चेहरा वापरून त्यावरून अश्लील फोटो तयार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी पीडित ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तर अज्ञात मोबाईल धारकविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचा चेहरा वापरून अश्लील चार फोटो तयार केले. ते फोटो फिर्यादी महिलेच्या मोबाईल फोनवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवले. त्या फोटोखाली आरोपीने ‘कसे आहेत फोटो’ असा मजकूर लिहून पाठवला. याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

ह्याही बातम्या वाचा –