फायदेशीर ! ४ मिनिटांच्या चार्जिंगवर १०० किमी धावते ‘ही’ आलिशान कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चारचाकी वाहनांच्या निर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी पोर्श हिने भारतात इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. पुढील वर्षांपर्यंत कंपनी बाजारात हि कार आणणार असून हि कार फार अत्यंत महागड्या सोयीसुविधांयुक्त आहे. महत्वाचे म्हणजे हि कार फक्त चार मिनिटांच्या चार्जिंगवर १०० किलोमीटर धावणार आहे.

या कारचे नाव टेकन असे ठेवण्यात आलं असून या वर्षी सप्टेंबर महिन्यात हि कार परदेशात लाँच होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत हो गाडी भारतात लाँच करण्याचे आमचे उद्दिष्ट्य असल्याचे पोर्श इंडियाचे संचालक पवन शेट्टी यांनी सांगितले. हि इलेक्ट्रिक कार ‘टेकन’ ८०० वोल्ट आर्किटेक्चरवर बनवण्यात आल्याने एकदा ४ मिनिटे चार्ज केल्यानंतर हि गाडी १०० किलोमीटर धावणार आहे. त्याचबरोबर बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर हि गाडी एकदाच ५०० किलोमीटर धावू शकेल.

दरम्यान, यासाठी कंपनीने यासाठी एका फाइव्ह स्टार हॉटेलसोबत करार केला आहे. या कराराच्या मार्फत या इलेक्ट्रिक गाडयांना चार्जिंगची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक गाडयांवरील कमी करण्यात आलेल्या जीएसटीच्या निर्णयाचे देखील स्वागत केले. नुकतेच केंद्र सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.

आरोग्यविषयक वृत्त –