‘महाविकासआघाडी’चं चर्चेचं ‘गुऱ्हाळ’ अजूनही ‘सुरुच’, उद्या पुन्हा ‘चर्चा’ होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडी सत्तास्थापनेच्या दिशेने कूच करताना दिसत आहे. परंतू त्यासाठी सुरु असलेले चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरुच आहे. आज मुंबईत नेहरु सेंटरला तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील पाऊल काय असणार याची माहिती दिली.

बैठकीनंतर बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती दिली की आज तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा पार पडली. आम्ही सर्व सत्तास्थापनेबाबत सकारात्मक आहोत. चर्चा देखील सकारात्मक झाली. परंतू पुढील निर्णय घेण्यासाठी उद्या चर्चा होईल.

चव्हाण म्हणाले की उद्या सर्व नेत्यांची पुन्हा बैठक होईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. चर्चा सकारात्मक झाली तरी पुढील चर्चा अजून बाकी आहे. चर्चा सुरु राहिलं. मागील काही दिवसांपासून राज्यात सत्तास्थापनेवरुन महाविकासआघाडीतील नेत्यांची बैठक सुरु आहे. अनेक संयुक्त बैठका देखील पार पडल्या. दिल्लीत देखील राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका पार पडल्या. परंतू अजूनही चर्चा पुढे सुरु राहणार असे आघाडीच्या नेत्याकडून सांगण्यात येत आहे.

निवडणूकीचा निकाल लागून महिना होईल तर अजूनही राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. यामुळे राज्यातील जनता आता संतापली आहे, त्याचे पडसाद सोशल मिडियावर देखील उमटत आहे. परंतू महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे की पुढील 2 दिवसात राज्यात सत्तास्थापन होईल.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like