दिलासादायक ! सलग 5 व्या दिवशी ‘कोरोना’ संक्रमितांपेक्षा Covid-19 मधून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत. भारत आता जगातील सर्वात वेगाने रुग्ण वाढणाऱ्या देशांपैकी एक बनला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमीही आहे. कोरोना प्रकरणापेक्षा गेल्या पाच दिवसांत देशात दररोज बरे होणारे रुग्ण अधिक आहेत. तसेच, गेल्या पाच दिवसांत चार लाखाहून अधिक लोक कोरोना विषाणूपासून बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत कोरोना प्रकरणांतून बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. या दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी एका दिवसात एक लाखाहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले, हा एक विक्रम आहे.

गेल्या पाच दिवसांत अनुक्रमे 95880, 94612, 93356, 101468, 89746 लोक बरे झाले आहेत. तर गेल्या पाच दिवसांत 93337, 92605, 86961, 75083, 83347 कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली आहेत.

भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 57 लाखांच्या पुढे गेली आहे, तर सध्या देशात दहा लाख सक्रिय रुग्णांची नोंद आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात करून 46 लाख लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना विषाणूमुळे 90 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात सुमारे सात कोटी कोरोना विषाणू चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि कोरोना परिस्थिती जाणून घेतली. ही अशी राज्ये आहेत जिथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पंतप्रधान मोदींच्या वतीने राज्यांना सतत जनजागृती करण्यास सांगितले, आरटी-पीसीआर चाचणीवर जास्तीत जास्त भर देण्यात यावा आणि मायक्रो कंटेनमेंट झोनवर जोर देण्यात यावा असेही सांगण्यात आले.

जगाकडे पाहिलं तर संपूर्ण जगात एकूण कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या पुढे गेली आहे. 71 लाखांहून अधिक लोक कोरोनाची विळख्यात सापडले आहेत, तर दोन लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिकेच्या नंतर भारत आणि ब्राझीलचा नंबर आहे.