बदलणार चेकनं पेमेंट करण्याची पधदत, नवीन वर्षात लागू होणार नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकेतील फसवणूक थांबविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरबीआयने 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम सुरु करण्याची गोष्ट सांगितली आहे. पॉझिटिव्ह पे सिस्टमअंतर्गत, 50,000 पेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी महत्त्वपूर्ण तपशीलांची पुष्टी करणे आवश्यक आहे. या सिस्टममध्ये चेक जारी करणार्‍यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जसे की, एसएमएस, मोबाइल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे चेकबद्दल काही माहिती द्यावी लागेल.

यामध्ये तारखेची माहिती, लाभार्थ्यांचे नाव, प्राप्तकर्ता आणि रक्कमेची माहिती द्यावी लागेल. देयकाचा चेक सादर करण्यापूर्वी हे तपशील जुळले जातील. जर काही विसंगती आढळली तर याची माहिती देय बँक आणि सादर करणार्‍या बँकेला दिली जाईल. हे दुरुस्त करण्यासाठी पावले उचलली जातील.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, या सुविधेचा लाभ खातेदारावर अवलंबून असेल. तथापि, बँका ही व्यवस्था 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी अनिवार्य करू शकतात. ही सिस्टम 1 जानेवारी 2021 पासून लागू होईल, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. एसएमएसद्वारे बँकेकडून ग्राहकांना याबाबत जागरूक करण्यास सांगण्यात आले आहे. यासह, बँका त्यांच्या शाखा, एटीएम तसेच त्यांच्या वेबसाइट आणि इंटरनेट बँकिंगबद्दल संपूर्ण माहिती देतील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like