Positive Payment Systems | 15 ऑगस्टपासून बदलणार आहेत बँक अकाऊंटचे ‘हे’ नियम, जाणून घ्या अन्यथा अडकू शकते तुमचे पेमेन्ट

नवी दिल्ली : Positive Payment Systems | चेकद्वारे पेमेंटबाबत होणार्‍या फ्रॉडवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Payment Systems) 1 जानेवारी 2021 पासून लागू केली होती. परंतु आता 15 ऑगस्टपासून ती अनिवार्य करण्यात येईल.

इंडियन बँकेने पाठवला अलर्ट

पब्लिक सेक्टरमधील इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांना याबाबत अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून सांगितले आहे की, 15 ऑगस्ट 2021 पासून 2 लाख रुपये किंवा यापेक्षा जास्तच्या चेकवर पॉझिटिव्ह पे सिस्टम (PPS) लागू करण्यात येईल.

गाईडलाइन्स जारी

चेक फ्रॉडची प्रकरणे मोठ्या प्रमाणात येऊ लागल्यानंतर आरबीआयने पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टमबाबत गाईडलाइन्स जारी केली होती. ती 1 जानेवारी 2021 पासून लागू सुद्धा केली आहे. आरबीआयने बँकांना म्हटले आहे की, 50,000 रुपये किंवा यापेक्षा जास्त रक्कमेचा चेक करणार्‍या सर्व अकाऊंट होल्डर्ससाठी हे अनिवार्य केले जाईल.

2 लाख रुपयांपेक्षा जास्त पेमेन्टसाठी आवश्यक

आरबीआयने हे सुद्धा म्हटले की, बँक आपल्याकडून हा नियम 5 लाख रुपये किंवा यापेक्षा जास्त रक्कमेसाठी सुद्धा अनिवार्य करू शकते.

काय आहे पॉझिटिव्ह पेमेन्ट सिस्टम?

पॉझिटिव्ह पेमेन्ट सिस्टम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने तयार केली आहे. या
सिस्टम अंतर्गत जास्त रक्कमेत व्यवहार करणार्‍या ग्राहकांना आपल्या चेकबाबत काही माहिती बँकेला द्यावी लागेल.

यानंतर या चेकचे पेमेन्ट क्लियर करतेवेळी या डिटेल्सची पडताळणी केली जाते. कोणतीही गडबड
किंवा डिटेल्स न जुळल्याच्या स्थितीत पेमेन्ट रोखले जाते.

चेक पेमेन्टसाठी द्यावी लागेल ही माहिती

इंडियन बँकेने म्हटले आहे, ग्राहकांनी आपला अकाऊंट नंबर, चेकर नंबर, जारी करण्याची तारीख, ट्रांजक्शन कोड, एमआयसीआर कोड द्यावा लागेल. ग्राहक ही माहिती बँकेत जाऊन, वेबसाइट, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे देऊ शकतात.

हे देखील वाचा

Pune Corporation | ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या निविदांना मंजुरी देण्याचे अधिकार ‘स्थायी समितीकडे’; प्रस्ताव मान्यतेसाठी ‘स्टॅन्डींग’च्या समोर

Ration card | घर बदलताना रेशन कार्ड हस्तांतरण करायचंय? जाणून घ्या एकदम सोपी प्रक्रिया

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Positive Payment Systems | positive payment systems to be mandatory in indian bank from 15th august said sms alert from bank

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update