दिलासादायक ! पुणे जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये होतेय घट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या दोन आठवड्यापासून पुणे(Pune) जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. जिल्ह्याचा दर गेल्या आठवड्याच्या दुलनेत 2 टक्क्यांनी घटला आहे. सध्याचा दर 15.83 असून गेल्या आठवड्यात हा दर 17 टक्के होता. यामुळे काही दिवसांपूर्वी बाधितांच्या दरात राज्यात आघाडीवर असलेला जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर हळूहळू आटेक्यात येत आहे. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे.

देशात डिसेंबरपर्यंत सर्वांना दिली जाईल कोरोना लस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

जिल्ह्यात 2 आठवड्यापूर्वी पुणे शहरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत होते. परिणामी शहरातील रुग्णालयात बेड, ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने बाधितांचे मोठे हाल झाले होते. लॉकडाऊन असतानाही कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढतच होती. मात्र 2 आठवड्यापासून घट झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्ण वाढत असलेतरी त्यांचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी 23 हजार 249 चाचण्या घेतल्या. त्यातील 3 हजार 127 जण कोरोनाबाधित आढळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सापडलेली रुग्णसंख्या ही कमी आहे. दरम्यान राज्याच्या पॉझिटिव्हिटीचा दर हा 9.96 टक्के आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दर सर्वाधिक 21.66 टक्के आहे. त्या खालोखाल रत्नागिरी, सातारा, सांगली जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर हा पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. राज्यात अनेक जिल्ह्यानी कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. त्यात जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधित सापडण्याचा दर 2.29 टक्के इतका आहे. त्यापाठोपाठ गोंदीया, भंडारा आणि नंदुरबार जिल्ह्यांचा रुग्णवाढीचा दर हा कमी आहे.

मल्टीविटामिनने भरलेल्या शेवग्याच्या भाजीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे; Drumstick चे फुलं, पानं अन् साल देखील खुपच फायद्याची, जाणून घ्या

मंत्री जयंत पाटलांचा टोला; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना स्वप्न बघण्याचा छंद’

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 999 रूग्ण ‘कोरोना’मुक्त 

सर्दी-तापाचा Virus करू शकतो कोरोनावर मात, वैज्ञानिकांचा दावा 

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या