‘मेगाभरती’ निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मार्च महिन्यात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया पुढे सरकत नव्हती. लोकसभा निवडणुकांनंतर याला चालना मिळेल असं वाटत होतं. मात्र आता जालना विधानपरिषदेच्या जागेसाठी २६ ऑगस्ट पर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठीची आचार संहिता १९ जुलैला सुरु झाली आहे. ती संपल्यावर विधानसभा निवडणुका सुरु होतील. त्यामुळे मेगाभरती निवडणुकीच्या आचार संहितेत अडकण्याची दाट शक्यता आहे.

मार्च महिन्यात मेगाभरतीच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी १६ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. शुल्क भरण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे ८ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे ही प्रक्रीया पुढे नेता आली नाही. लोकसभा संपल्यावर भरती प्रक्रिया सुरळीत होतील, असं वाटत होते. मात्र शासनाने कोणतेही निर्देश किंवा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या नाहीत. त्यात आता जालना विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणूक आचारसंहिता १९ जुलैला लागू झाली, ती २६ ऑगस्टपर्यंत असणार आहे. त्यामुळे पुन्हा भरती प्रक्रिया अडण्याची शक्यता आहे.

तसंच ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका असणार आहेत. त्यासाठी सप्टेंबर महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागु करण्यात येईल. त्यामुळे या बेरोजगार तरूणांना अजून २-३ महिने भरती प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारने मेगा भरतीत कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आदी विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. परंतू सतत सुरु असलेल्या आचारसंहितेमुळे या भरती प्रक्रियेला वेळ लागत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –