अरे बाप रे ! आता खासदार नवनीत कौर राणा भाजपमध्ये प्रवेश करणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत आणि युवा स्वाभिमानी पक्षाच्या अमरावतीतील खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याला कारण की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवनीत राणा यांनी घेतलेली भेट. एवढेच नाही तर त्यांचे पती रवी राणा यांचे ‘बदल होत असतात’ हे विधान. याकारणाने नवनीत राणा यांची भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

अमरावतीतील विकास कामांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अमित शाहांची भेट घेतल्याचे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. अमरावतीचा विकास या एकमेव मुद्दयावर आमची चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यानंतर रवी राणा यांनी बदल होत असतात असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे जर नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना समर्थन दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसू शकतो. सर्व भारतात भाजपने विजयांचा झेंडा फडकवला असला तरी अमरावतीतील भाजपचे खासदार आनंदराव अडसूळ यांना नवनीत राणांनी पराभूत केले आहे.

कोण आहेत नवनीत राणा –

नवनीत कौर राणा या आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. त्यांची ओळख म्हणजे त्या दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री आहेत. 2011 साली अमरावतीतील रवी राणा यांनी एक सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी स्वता रवी राणा आणि नवनीत कोर राणा विवाहबद्ध झाले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात 3100 जोडप्यांचा विवाह पार पडला होता.

आरोग्य विषयक वृत्त

‘केस’ धुताना घ्या ही काळजी

‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा

ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान

महाराष्ट्राभोवती कॅन्सरचा विळखा घट्ट ; रुग्णांची संख्या वाढली