Coronavirus : कोरोनातून बरे झाल्यानंतरही ह्रदयविकाराची समस्या उद्भवू नये म्हणून काय करावे? जाणून घ्या तज्ञांकडून

नवी दिल्ली : पोलीसमाना ऑनलाइन – कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना ह्रदय किंवा फुफ्फुसाचा त्रास जाणवतो. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पण कोरोनातून बरे झाल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायची अनेकांना माहिती नसेल. आता आज या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळणार आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या ह्रदयात त्रास जाणवतो. ह्रदय काम करण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासते. ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरात दुसऱ्या अवयवात पोहोचवण्यासाठी ह्रदयाची मुख्य भूमिका असते. हा ऑक्सिजन ह्रदयाला फुफ्फुसाकडून मिळतो. कोरोना व्हायरस थेट फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागते. यामध्ये ह्रदयाला त्रास जाणवतो.

संजय गांधी पीजीआय लखनौचे ह्रदयरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. नवीन गर्ग यांनी सांगितले की, कोविड-19 च्या गंभीर रुग्णांच्या ह्रदयावर कोरोनाचा मोठा प्रभाव पाहिला मिळतो. 85 टक्के रुग्ण होम आयसोलेशननंतर बरे होतात. पण तरीही रुग्णाला कोणतेही लक्षणे आढळल्यास तपासणी करणे गरजेचे आहे.

कोरोनातून बरे झालेले रुग्ण ऑक्सिजन थेरपीने बरे झाले असतील तर त्यांनी तीन लक्षणांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. एक तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल किंवा अचानक ह्रदयाचे ठोके वाढत असतील तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

तुम्ही धूम्रपान करत असाल तर…

जर तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा तुम्हाला दारू पिण्याची सवय असेल तर तुम्ही तातडीने ते बंद करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही बरे झाल्याच्या सहा महिन्यांपर्यंत याचे सेवन करू नये. ज्या फळांमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते ते लसींचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी मदत करतो. या फळांमध्ये ताज्या आणि पुरेशा प्रमाणात खाणे गरजेचे आहे. टरबूज, खरबूज, चिक्कू, अननस, केळी आणि आंबा यांसारखी फळे फायदेशीर असतात. हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

तसेच तुम्ही हळूहळू मॉडरेट एक्सरसाईज करावी. कोरोनातून बरे झाल्यानंतर झोपून राहू नये. खोलीत चालावे. योगासने करावे. सकारात्मक विचार ठेवावा. वॉकला दैनंदिन जीवनाचा हिस्सा मानावा.