Post covid recovery : कोरोनाने आलेली कमजोरी दूर पळवा, फुल रिकव्हरीसाठी करा ‘ही’ 10 कामं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाची हलकी लक्षणे असलेले रूग्ण 14 दिवसात बरे होतात. मात्र, निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा थकवा आणि कमजोरी कायम राहते. काही लोकांना तर यातून पूर्णपणे ठिक होण्यास 6-8 महिन्यांचा काळ लागतो. लवकर रिकव्हरी आणि जुन्या रुटीनमध्ये परत येण्यासाठी हेल्थ एक्सपर्टच्या काही टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात. डॉक्टर दिक्षा भावसर यांनी इंस्टाग्रामवर या टिप्स दिल्या आहेत.

हे लक्षात ठेवा
1 सकाळी लवकर उठा –
सकाळी लवकर उठल्याने सकारात्मक उर्जा जाणवते. ताजी हवा शरीराला अ‍ॅक्टिव्ह करते. सकाळी व्यायाम करण्यासाठी उत्साह असतो.

2 सोप्या एक्सरसाईजने सुरूवात –
जड एक्सरसाईज करू नका. हळुहळु वॉकपासून सुरूवात करा, ब्रिदिंग एक्सरसाइज, मेडिटेशन करा. या काळात शरीराला आराम हवा असतो.

3 प्राणायाम करा –
नियमित अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायाम करा, यामुळे शरीरात ऑक्सीजनची कमतरता होत नाही.

4 सकाळचे उन घ्या –
रोज सकाळी 30 मिनिटे उन्हात बसा. यामुळे व्हिटॅमिन डी आणि एनर्जी मिळेल.

5 ड्राय फ्रुट्स खा –
रात्रभर पाण्यात भिजवलेले एक खजूर, मुठभर मनुके, दोन बदाम आणि अक्रोड रोज सकाळी खा. शरीर आतून मजबूत होईल.

6 लंचकडे लक्ष द्या –
कोरोनातून बरे झाल्यानंतर काही दिवस हलके आणि सहज पचणारे पदार्थ खा. रोज डाळीचे पाणी प्या, एक दिवसाआड पौष्टिक खिचडी खा.

7 शेवगा सूप –
शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात. डिप्रेशन, जीव घाबरणे आणि थकवा दूर होतो. यासाठी आठवड्यातून दोन-तीन वेळा शेवग्याच्या शेंगाचे सूप प्या.

8 जीरे, धने, बडीसोपचा चहा –
दिवसात दोन वेळा जीरे, धने आणि बडीसोपचा चहा प्या. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते, वजन नियंत्रणात राहते, तणाव कमी होतो, इम्युनिटी आणि पचन चांगले होते. जेवणानंतर एक तासाने प्या.

9 रात्री लवकर झोपा –
जास्त वेळ आणि चांगली झोप घेतल्याने लवकर बरे व्हाल. यासाठी रात्री लवकर झोपा.

10 मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग –
मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियमित पालन करा.