पुण्यातील अपोलो क्लीनीकमध्ये कोरोनामुक्त रुग्णांसाठी आता ‘पोस्ट कोविड ओपीडी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना सतावणा-या पोस्ट-कोविड सिंड्रोमवर उपचाराकरिता पुण्यातील अपोलो क्लीनीकच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. अपोलो क्लिनिकने पोस्ट-कोविड रिकव्हरी ओपीडी सुरू केल्याने कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतरही ज्या रुग्णांना इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्या रुग्णांना ही सेवा पुरवण्यात आली आहे.

कोविड -१९ हा संसर्ग शरीराच्या सर्वच महत्वाच्या अवयवांवर हल्ला करते. हा संसर्ग केवळ फुफ्फुसांवरच नाही तर शरीराच्या इतर भागांवरही आक्रमण करतो आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढतात. कोविड -१९ पासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये खोकला, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी), ताणतणाव, छातीत दुखणे, नैराश्य, झोपेची कमतरता, मेंदूतील रक्तवाहिन्यांत गुठळ्या तयार होणे, चिंता, सांधेदुखी, श्वासोच्छ्वासात अडचणी आणि न्यूरोलॉजिकल समस्या दिसून येत आहे. अशावेळी घाबरुन न जाता रुग्णांनी त्वरीत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्ट्रोक आणि हदयविकारा व्यतिरिक्त मधुमेह, फुफ्फुसातील फायब्रोसिस आणि उच्च रक्तदाब यासारख्या इतर परिस्थितीही पोस्ट कोविड सिंड्रोमचा एक भाग आहे. या संसर्गाचे दीर्घकालीन परिणाम देखील आहेत. म्हणूनच, कोविडनंतर रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यात अचानक वाढ झाल्याचे निदर्शनात येत आहे.

अपोलो हेल्थ अँड लाइफस्टाईल लिमिटेडचे वैद्यकीय संचालक डॉ अजय गांगोली सांगतात कोरोना संसर्गातून मूक्त झाल्यानंतरही विविध समस्यांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. तीव्र आणि अती तीव्र असे दोन चरण आहेत. पोस्ट कोविड लक्षणे दिसणारे रुग्णांमध्ये 3 महिन्यापर्यंत लक्षणे दिसतात तेव्हा तीव्र पोस्ट कोविड असते. या लक्षणांना क्रोनिक पोस्ट कोविड म्हणून संबोधले जाऊ शकते. कोविडच्या जवळपास १०% रुग्ण ‘लाँग कोविड’ लक्षणे दर्शवितात तर थोड्या लोकांना ३ महिन्यांपेक्षा जास्त लक्षणे दिसतात. अशा रुग्णांकरिता पोस्ट-कोविड ओपीडी एक वरदान आहे. रूग्णांना त्यांच्या समस्यांसाठी विशेष काळजी काय घ्यावी याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन तसेच मृत्यु दर कमी करून त्यांचे आरोग्य पूर्ववत करण्यात फायदेशीर ठरते. या क्लीनीकच्या माध्यमातून रुग्णांच्या लक्षणांबद्दल नियमितपणे त्यांचे परीक्षण केले जाईल आणि वेळेवर वैद्यकीय उपचार केले जातील.