पोस्टाच्या ‘या’ दोन योजना देतात FD पेक्षा अधिक फायदा ; जाणून घ्या काय आहे पोस्टाची ‘स्कीम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस ग्राहकांना नवनव्या योजना उपलब्ध करून देत असते. पोस्टात गुंतवलेले पैसेही चांगला परतावा मिळवून देतात. पोस्ट ऑफिसने आता आपल्या ग्राहकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना व सुकन्या समृद्धी योजना या योजना आणल्या आहेत. या योजनेचा दर ८ टक्क्यांहून जास्त आहे. यात गुंतवणूक केल्यास अधिक फायदा मिळू शकतो.

१) ज्येष्ठ नागरिक बचत योजना
या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक ५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. मॅच्युरिटीनंतर या योजनेचा कालावधी ३ वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. वरिष्ठ नागरिकांसाठीची पोस्ट ऑफिसची ही स्कीम सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे.

व्याजदर –
या योजनेत ८. ७ % दराने व्याज मिळेल .या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यावर १ एप्रिल २००७ पासून इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट १९६१ च्या सेक्शन ८०C प्रमाणे कर सवलत मिळते.

खाते खोलण्यासाठी नियम व अटी –
ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर ६० पेक्षा जास्त वयाचे नागरिकांना खाते खोलता येईल. तर VRS घेतलेल्या ५५ र्षानंतर अकाउंट सुरू करता येईल. कॅश किंवा चेकद्वारे तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. १ लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर चेक द्यावा लागेल.

२) सुकन्या समृद्धी योजना
या योजनेमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या १० वर्षापर्यंतच्या मुलींच्या नावे खाते खोलू शकतो. यात १४ वर्षच गुंतवणूक करता येते.
उदा. १ वर्षांच्या मुलीच्या नावे खातं उघडलंत तर तिच्या १५ व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करता येईल. या खात्यात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये एका वर्षासाठी
गुंतवता येईल. १४ वर्षानंतर ४० लाख रुपये मिळतील किंवा मुलगी २१ वर्षांची झाल्यावर ६४. ८ लाख रुपये मिळतील.

व्याजदर –
या योजनेत ८. ५ % दराने व्याज मिळेल .या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यावर १ एप्रिल २००७ पासून इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट १९६१ च्या सेक्शन ८०C प्रमाणे कर सवलत मिळते.

असे उघडा खाते –
सुकन्या योजनेत खाते खोलण्यासाठी पोस्ट ऑफिसमधून फॉर्म घ्या किंवा इंडिया पोस्टच्या वेबसाइटवरून फाॅर्म डाऊनलोड करा.

फॉर्म योग्य रीतीने भरून त्यावर तुमचा आणि तुमच्या मुलीचा फोटो लावा.
फॉर्मसोबत आयडी , घरच्या पत्त्याचं प्रूफ , आधारकार्ड , मुलीचं बर्थ सर्टिफिकेट दे डॉक्यूमेंट सोबत जोडा.