खुशखबर ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, बँकेपेक्षा आधिक ‘व्याजदर’ मिळवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही कमी गुंतवणूक जास्त परतावा म्हणजे व्याज मिळवू इच्छित असाल ते ही कोणत्याही जोखमीसाठी तर तुम्हाला पोस्ट ऑफिसची योजना फायदेशीर ठरु शकते. पोस्ट ऑफिस कायमच आपल्या ग्राहकांना विविध गुंतवणूकीची योजना देते, त्यामुळे ग्राहकांना गुंतवणूकीसाठी अनेक पर्याय मिळतात. यात आणखी एक योजना आहे ज्यात सामान्य खात्यापेक्षा आधिक परतावा तुम्हाला मिळू शकेल आणि करातून देखील सूट मिळू शकेल.

फक्त १०० रुपयांपासून गुंतवणूक ७.९ टक्के व्याजदर
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही भारत सरकारची एक छोटी बचत योजना आहे. ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते. या योजनेची एक विशेषता म्हणजेच तुम्ही यात १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. यात १००, ५००, १०००, ५००० रुपयांच्या गुंतवणूकीचे बॅन्ड मिळतात. परंतू यात गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार या योजनेत गुंतवणूक करू शकतात. बचत खात्यासाठी बँकमध्ये फक्त ४ टक्के व्याज देण्यात येते, मात्र एनएससीच्या योजनेत ७.९ टक्के व्याजाचा परतावा मिळतो.

गुंतवणूक ५ वर्षांचा कालावधी
कोणीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करु शकतो, तुम्ही यात तुमच्या मुलांच्या नावे देखील गुंतवणूक करु शकतात. यात देण्यात येणाऱ्या बॅन्डच्या मॅच्युरिटीचा कालावधी ५ वर्षाचा असतो. त्या तुम्हाला मिळणारे व्याज दरवर्षाला जोडले जाते. तुम्ही गुंतवलेली १०० रुपयांची रक्कम ५ वर्षानंतर १४४ रुपये होईल. या योजनेत करावर देखील सूट देण्यात आली आहे मात्र यात ही मर्यादा फक्त १.५ लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही योजना सरकारी आहे. त्यामुळे कोणतीही जोखीम नाही आणि परतावा निश्चित आहे.

मॅच्युरिटीचा कालावधी ५ वर्षांचा आहे, परंतू तुम्ही काही अटींची पूर्तता केल्यास तुम्हाला १ वर्षाच्या कालावधीत खाते बंद करुन रक्कम काढण्याची सुविधा मिळते. नॅशनल सेविंग सर्टिफिकेटचे व्याजदर दर ३ महिन्यांनी बदलत असतात. त्यामुळे गुंतणूकदार ग्राहक आपल्या गुंतवणूकीची रक्कम कमी आधिक करु शकतात.

१८ वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती करु शकतात गुंतवणूक
या योजनेची विशेषता म्हणजे १८ वर्षापेक्षा कमी वयाचे गुंतवणूकदार देखील या योजनेचा लाभ मिळवू शकतात. यासाठी या मुलांच्या पालकांना या योजनेसाठीचे नॅशनल सर्टिफिकेट खरेदी करावे लागेल. यात ज्वाइंट खात्याची देखील सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय तुम्ही या योजनातील रक्कम एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील ट्रांसफर करु शकतात. याशिवाय तुम्ही या योजनेतील बॅन्ड एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या नावे देखील हस्तांतरित करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त