कामाची गोष्ट ! पोस्टानं बदलले ‘हे’ नियम, पैशांचे व्यवहार करण्यापुर्वी नक्की जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्टामध्ये बचत खाते असणाऱ्यांसाठी पोस्ट खात्याने दिलासा दिला आहे. पोस्टामध्ये 25 हजारांपेक्षा अधिकची रक्कम भरण्यासाठी क्लिष्ट अट ठेवली होती. मात्र, ग्राहकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्यानंतर पोस्टाने सोईसाठी हा नियमच बदलला आहे. या बदललेल्या नियमाचा फायदा नव्या आणि जुन्या ग्राहकांना होणार आहे.
पोस्टाने बदललेला नियम
पोस्टामध्ये खातेदारांना नॉन होम ब्रँच म्हणजे स्थानिक शाखेशिवाय अन्य शाखेत पीपीएफ, आरडी किंवा सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये 25 हजारांपेक्षा जास्त रक्कम भरता येत नव्हती. तसेच चेकही जमा करता येत नव्हता. याची तक्रार अनेक ग्राहकांनी केली होती. ग्राहकांच्या तक्रारीनंतर पोस्ट खात्याने हा नियमच बदलला आहे. नव्या नियमानुसार कोणत्याही शाखेमध्ये 25 हजार किंवा त्याहून जास्त रक्कम, चेक भरता येणार आहे. या नव्या नियमामुळे पोस्टातील ग्राहकांचा त्रास कमी होणार आहे.
पैसे काढायचे असतील तर चेक द्यावा लागेल
यासाठी आधीचा नियम बदलला आहे. तसेच बचत खाते, आरडी, पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत कोअर बँकिंगद्वारे 25 हजारांपेक्षा जास्तीचा चेक कोणत्याही शाखेत भरता येणार आहे. मात्र, अन्य कोणत्याही पोस्टाच्या ब्रँचमधून पैसे काढायचे असतील तर जास्तीत जास्त 25 हजार रुपये काढता येणार आहेत. त्यासाठी चेक द्यावा लागणार आहे.
नव्या-जुन्या ग्राहकांना फायदा
पोस्ट खात्याने जुना नियम बदलून नवा नियम केल्याने याचा फायदा नव्या ग्राहकांसह जुन्या ग्राहकांना होणार आहे. जर कोणी नोकरीनिमित्त बाहेरगावी असेल तर त्याला हा फायदा होणार आहे. या क्लिष्ट नियमांचा पोस्ट खात्यालाही फटका बसत होता. या नियमांमुळे योजनांचे हप्ते थकित राहात होते त्यामुळे पोस्ट खात्याचे नुकसान होत होते.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- मेहनत करूनही ‘सिक्स पॅक अॅब्स’ होत नाहीत ? मग ‘या’ 5 टिप्स जाणून घ्या
- मच्छरांबद्दलच्या ‘या’ 6 खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ? जाणून घ्या
- आठवड्यातील ‘हा’ वार आहे सर्वात ‘डिप्रेसिंग’, जाणून घ्या 4 कारणे
- ‘किडनी स्टोन’ असताना ‘या’ 8 पदार्थांचे सेवन पडू शकते महागात !
- ‘या’ 5 गोष्टी आहेत डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर
- तासनतास बसून काम केल्याने होतात ‘या’ 4 समस्या, जाणून घ्या
- जिभेच्या 5 प्रकारावरून ओळखा तुम्हाला कोणता आजार झालाय