Post Office मध्ये FD करणार्यांनी लक्ष द्यावे, आकर्षक व्याजासह मिळतील अनेक मोठे फायदे, येथे जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सुद्धा पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office) मोठी कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (Fixed deposit) मध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (FD ) केल्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या विशेष सुविधा सुद्धा मिळतात. याशिवाय तुम्हाला सरकारी गॅरंटी सुद्धा मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे पैसे पूर्ण सुरक्षित राहतात. तसेच व्याज सुद्धा मिळते. तुम्हाला तिमाही आधारावर व्याजाची सुविधा मिळते. post office fixed deposite scheme you can get many benefits on it know about it
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करणे खुप सोपे आहे. इंडिया पोस्टच्या (India post) वेबसाइटनुसार, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही 1,2, 3, 5 वर्षांसाठी एफडी करू शकता. याचे कोणत्या प्रकारचे फायदे मिळतात ते जाणून घेवूयात…
1. पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स्ड डिपॉझिट केल्यास भारत सरकारची गॅरंटी मिळते.
2. ही एक सरकारी योजना आहे आणि यामध्ये गुंतवणुकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात.
3. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एफडी ऑफलाइन (कॅश, चेक) किंवा ऑनलाइन (नेट बँकिंग/मोबाइल बँकिंग) च्या द्वारे करू शकता.
4. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 1 पेक्षा जास्त एफडी करू शकता. याशिवाय एफडी अकाऊंटला जॉईंट करू शकता.
5. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षासाठी फिक्स्ड डिपॉझिट केले तर तुम्हाला आयटीआर फाईल करताना टॅक्समध्ये सूट मिळेल.
6. एका पोस्ट ऑफिसमधून तुमची एफडी दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे ट्रान्सफर केली जाऊ शकते.
–
कशा प्रकारे उघडू शकता एफडी
पोस्ट ऑफिसमध्ये एफडीसाठी तुम्ही चेक किंवा कॅश देऊन खाते उघडू शकता. अकाऊंट उघडण्यासाठी किमान 1000 रुपये लगतात. या अकाऊंटमध्ये कमाल रक्कम जमा करण्याची कोणतीही मर्यादा नाही.
किती मिळते एफडीवर व्याज
एफडीवर मिळणार्या व्याजाबाबत बोलायचे तर ते 7 दिवसापासून एक वर्षाच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज मिळते. 1 वर्ष 1 दिवसापासून 2 वर्षाच्या एफडीवर सुद्धा समान व्याजदर आहे. 3 वर्षापर्यंतच्या एफडीवर सुद्धा 5.50 टक्केच्या दराने व्याज मिळते. 3 वर्ष एक दिवस ते 5 वर्षापर्यंत एफडीवर 6.70 टक्के व्याज मिळते.
मिळतात या सुविधा
याशिवाय ग्राहकांना अकाऊंट ट्रान्सफर (Account transfer) करण्याची सुद्धा सुविधा मिळते. तुम्ही एफडीला आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकता. याशिवाय नॉमिनीची नोंद करणे किंवा बदलण्याची सुद्धा सुविधा दिली जाते. तुम्ही नॉमिनीची नोंद अकाऊंट उघडल्यानंतर सुद्धा करू शकता किंवा बदलू शकता.
Wab Title :- post office fixed deposite scheme you can get many benefits on it know about it
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार
‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी
शेतकर्यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत