Post Office च्या ‘या’ योजनेत मिळते FD आणि RD पेक्षा सुद्धा जास्त व्याज, काही वर्षातच जमा होतील लाखो रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक करणे सुरक्षित आणि नफा देणारे मानले जाते. येथे अनेक योजना आहेत, ज्या गुंतवणुकीवर चांगले व्याज देतात. सोबतच यामध्ये मोठ्या कालावधीपर्यंत गुंतवणूक सुद्धा करता येऊ शकते. पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही अशीच एक योजना (Post Office) आहे.

 

मोठ्या कालावधीसाठी यामध्ये पैसे लावता येऊ शकतात.
यामध्ये FD आणि RDपेक्षा जास्त व्याज मिळते. 2021- 22 साठी व्याजदर 7.1 टक्के दिले जात आहे.
यामुळे जर तुम्ही गुंतवणूक केली तर काही वर्षातच लाखोचा फंड तयार होईल.

 

अशाप्रकारे जमा होऊ शकतात 40 लाख

 

Post Office च्या या योजनेची मॅच्युरिटी 15 वर्षासाठी आहे. परंतु तुम्ही ती पाच-पाच वर्ष पुढे वाढवू शकता.
या योजनेत 1.50 लाख रुपये वार्षिक जमा करू शकता किंवा दरमहिना 12500 रुपयांची गुंतवणूक करू शकता.
टॅक्स अ‍ॅक्ट 80सी अंतर्गत इन्कम टॅक्स सवलतीचा लाभ घेऊ शकता.
जर दरमहिना 12,500 ची गुंतवणूक केली तर वार्षिक 1.50 लाख रुपये होतात आणि 15 वर्षात गुंतवणूक 22.50 लाख रुपये होते तर एकुण मॅच्युरिटी अमाऊंट 40.70 लाख होईल.

 

पीपीएफ खाते उघडण्याची पात्रता

 

  • पगारदार, स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह भारतीय रहिवासी पोस्टात पीपीएफ खाते उघडू शकतात.
  • अल्पवयीन मुलांकडून आई-वडील/पालकांद्वारे पोस्ट ऑफिसमध्ये अल्पवयीन पीपीएफ खाते उघडता येते.
  • अनिवासी भारतीयांना पीपीएफ खाते उघडण्याची परवानगी नाही. मात्र, जर कुणी भारतीय रहिवाशी पीपीएफ खाते मॅच्युअर होण्यापूर्वी एनआरआय झाला तर तो यासाठी पात्र आहे.

 

पीपीएफ खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 

ओळख प्रमाणपत्र म्हणून वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि पत्त्यासाठी वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि नामांकन फॉर्म- फॉर्म ई ची आवश्यकता आहे.

 

पीपीएफ खात्यात ऑनलाइन पैसे कसे जमा करावे?

 

पोस्ट ऑफिस पीपीएफ (Post Office PPF Account) खातेधारक इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) अ‍ॅपद्वारे ऑनलाइन पैसे जमा करू शकतात. (Post Office)

 

  1. आपल्या पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्यात पैसे जमा करण्यासाठी सर्वप्रथम मोबाइलमध्ये आयपीपीबी अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल.
  2. यानंतर बँक खात्यातून आयपीपीबी खात्यात पैसे पाठवा. यानंतर पोस्ट विभाग (डीओपी) सेवा ऑपशनवर जा.
  3. आता त्या खात्याचा प्रकार निवडा जो तुम्हाला निवडायचा आहे. याबाबतीत, जन भविष्य निधी खाते निवडावे लागेल.
  4. आता आपला पीपीएफ खाते क्रमांक आणि डीओपी ग्राहक आयडी नोंदवा.
  5. यानंतर ती रक्कम नोंदवा जी तुम्हाला जमा करायची आहे. आणि ‘पे’ पर्याय निवडा. आता पुढे जाऊन पैसे जमा करू शकता.

 

Web Title : Post Office | in this scheme of post office more interest is available than fd and rd lakhs of rupees will be deposited in a few years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dhananjay Munde | पंकजाताईंकडून दिवाळीच्या शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणाले…

Eknath Shinde | पोलिसांचा सण झाला गोड ! पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना भरवला ‘फराळ’

PMGKAY | देशातील 80 कोटी गरीबांना नोव्हेंबरनंतर सुद्धा मिळणार का मोफत रेशन? केंद्रीय सचिवांनी दिली ‘ही’ माहिती