Post Office च्या ‘या’ बँकेत असेल खाते तर 1 ऑगस्टपासून होत आहे मोठा बदल, खर्च करावे लागतील जास्त पैसे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office | जर तुमचे सुद्धा इंडिया पोस्ट पेमेंट बँक (india post payments bank) मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. बँकेच्या खातेधारकांना 1 ऑगस्टपासून डोअरस्टेप बँकिंग (doorstep banking charges) साठी सुद्धा पैसे खर्च करावे लागतील. याशिवाय बँकेने 1 जुलैपासून व्याजदरात (ippb interest rate) सुद्धा कपात केली आहे, त्यामुळे तुम्हाला मिळणारा फायदा सुद्धा कमी झाला आहे. आयपीपीबीने याबाबत माहिती दिली आहे. सध्या डोअर स्टेप बँकिगवर कोणताही चार्ज नाही. post office | india post payments bank customers pay doorstep banking charges from 1 august 2021 check details
1 ऑगस्ट 2021 पासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांना डोअरस्टेप बँकिग (doorstep banking charges) साठी प्रति कस्टमर रिक्वेस्ट 20 रुपये खर्च करावे लागतील.
बँकेने नुकतीच व्याजदरात सुद्धा कपात केली आहे.1 जुलैपासून सेव्हिंग्ज अकाऊंटला कमी व्याज मिळेल.
आता किती मिळत आहे व्याज
अगोदर ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत बॅलन्सवर 2.75 टक्के व्याज मिळत होते.
परंतु बँकेने ते 25 बेसिस पॉईंट कमी करून 2.50 टक्के केले आहे.
जुलैपासून सप्टेंबर पर्यंतच्या तिमाहीत ग्राहकांना 2.5 टक्के दराने व्याज मिळेल.
तर, 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत ठेवणार्यांना 2.75 टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल.
अगोदर ग्राहकांना बॅलन्स चेक करणे, पैसे ट्रान्सफर करणे आणि दुसर्या आर्थिक व्यवहारांसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत होते.
आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमतून ग्राहकांना बँकिंग सेवा मिळू शकतात.
Web Title : post office | india post payments bank customers pay doorstep banking charges from 1 august 2021 check details
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune News | बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
Praveen Darekar | ‘एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्याचा ‘महाविकास’चा डाव’