Post Office | पोस्ट ऑफिस सुद्धा देते करोडपती बनण्याची संधी, दररोज करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office | पोस्ट ऑफिस (Post Office) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) तुम्हाला करोडपती बनण्याची संधी देतो. केवळ तुम्हाला या अकाऊंटमध्ये दररोज 417 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या अकाऊंटचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा आहे, परंतु तुम्ही 5-5 वर्षांसाठी दोनवेळा त्यास एक्सटेंड करू शकता. सोबतच या योजनेत तुम्हाला टॅक्स बेनिफिटसुद्धा मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनते वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते आणि जे दरवर्षी कपाऊंडिगचा सुद्धा लाभ देते. अखेर ही योजना तुम्हाला कशी करोडपती बनवते ते जाणून घेवूयात…

15 वर्षांच्या गुंतवणुकीवर किती होईल फंड

एका दिवसात 416 रुपये, कमाल मासिक 12500 रुपये आणि वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील. 7.1 टक्केच्या वार्षिक व्याजाने कंपाऊंडिंग लाभ मिळेल. एकुण गुंतवणूक 15 वर्षानंतर 22.50 लाख रुपये होईल. ज्यावर व्याज 18.18 लाख रुपये होईल. एकुण रक्कम 40.68 लाख रुपये होईल.

अशाप्रकारे बनू शकता करोडपती

जर तुम्ही मॅच्युरिटी कालावधीच्या पुढे 5-5 वर्ष म्हणजे 10 वर्ष स्कीम एक्सटेंड केली तर तुमची रक्कम 1 कोटीपर्यंत पोहचण्यास मदत होईल. कशी ते पाहुयात. एका दिवसात 416 रुपये, कमाल मासिक 12500 रुपये आणि वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील. 7.1 टक्केच्या वार्षिक व्याजाने कंपाऊंडिंग लाभ मिळेल. एकुण गुंतवणूक 25 वर्षानंतर 37.50 लाख रुपये होईल. ज्यावर व्याज 65.58 लाख रुपये होईल. एकुण रक्कम 1.03 कोटी रुपये होईल.

 

कोण उघडू शकतात PPF

सॅलरीड, सेल्फ इम्प्लॉईड, पेन्शनर्स इत्यादींसह कुणीही रहिवासी.

केवळ एकच व्यक्ती अकाऊंट उघडू शकतो, जॉईंट अकाऊंट उघडता येत नाही.

अल्पवयीन मुलांच्यावतीने आई-वडिल, पालक खाते उघडू शकतात.

अनिवासी भारतीय यामध्ये खाते उघडू शकत नाही. जर कुणी निवासी भारतीय पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीच्या अगोदर एनआरआय झाला, तर तो मॅच्युरिटीपर्यंत खात्याचे संचलन सुरू ठेवू शकतो.

पोस्ट ऑफिस पीपीएफ आवश्यक कागदपत्र

ओळख पत्र – वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड.

अ‍ॅड्रेस प्रूफ- वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड.

पॅन कार्ड

पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

नामांकन फॉर्म- फॉर्म ई

PPF खात्याची मुख्य वैशिष्ट्ये

पीपीएफ खाते उघडण्यासाठी मिनिमम अमाऊंटमध्ये काही बदल केले आहेत. ही रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असू नये आणि ती 50 रुपयांच्या मल्टीपलमध्ये असावी. एका आर्थिक वर्षात खात्यात कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येईल. पीपीएफ खाते उघडण्यासाठी अब फॉर्म ऐवजी फॉर्म 1 भरावा लागेल.

 

Web Title : Post Office | india post post office public provident fund features benefits tax deductions and premium

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO Alert | पीएफ खातेधारकांनी व्हावे सावध! ‘या’ गोष्टीकडे दिले नाही लक्ष तर गमवावी लागेल सर्व रक्कम

Sakianaka Rape Case | बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Gold Price Update | सोन्याच्या दरातील घसरणीमुळे खरेदीदारांची ‘चांदी’, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर