Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवू शकता तुम्ही पैसे, 10 हजाराच्या बचतीवर मिळेल 16 लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस (Post Office) तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकते. पोस्ट ऑफिस (Post Office) स्कीम्समध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळते. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम चांगल्या असतात. यामध्ये कमी खर्चात गुंतवणूक केल्यास मोठी कमाई (Earn Money) होऊ शकते. पोस्ट ऑफिसची अशीच एक स्कीम आहे जिचे नाव – पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) आहे. यामध्ये तुम्हाले रिटर्न मिळते.

काय आहे पोस्ट ऑफिस RD स्कीम?

एकुणच या स्कीमद्वारे तुम्ही खुप कमी पैशांनी गुंतवणूक सुरू करू शकता.
यामध्ये तुमचे पैसे सुद्धा पूर्णपणे सुरक्षित राहतील. तुम्ही 100 रुपये महिना किमान गुंतवणूक करू शकता. जास्तीत जास्त कोणतेही लिमिट नाही. तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिस RD डिपॉझिट अकाऊंट चांगल्या व्याजदरासह छोट्या हप्त्ये जमा करण्याची एक सरकारची गॅरंटी योजना आहे.

जाणून घ्या किती मिळेल व्याज?

पोस्ट ऑफिसमध्ये जे RD अकाऊंट ओपन होते ते 5 वर्षासाठी असते.
यापेक्षा कमी कालावधीसाठी हे खाते नाही. दर तिमाही (वार्षिक रेटने) जमा रक्कमेवर व्याजाचे कॅलक्युलेशन केले जाते.
नंतर ते दर तिमाहीच्या अखेरीस तुमच्या अकाऊंटमध्ये चक्रवाढ व्याजासह (compound interest) जोडले जाते.

इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, RD स्कीमवर सध्या 5.8 टक्के व्याज दिले जात आहे.
केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीला आपल्या सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये (small saving schemes) व्याजाची घोषणा करते.

10 हजार रुपये गुंतवल्यास मिळतील 16 लाखापेक्षा जास्त

जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक 10 वर्षासाठी केली तर ते मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील.

Web Title : Post Office | invest post office recurring deposit scheme rs 10000 and get 16 lakh rupees check know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | फेसबुकवरून श्वानाचे पिल्लू खरेदी करणे पडले महागात, जाणून घ्या प्रकरण

Mumbai Ratna Award | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा ‘मुंबई रत्न’ पुरस्काराने सन्मान

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरूणाची आत्महत्येची धमकी, सोशल मिडीयावरून तरूणीला केलं प्रपोज