Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवा 150 रुपये, मॅच्युरिटीनंतर मिळतील 20 लाख; अशी करा गुंतवणूक
नवी दिल्ली : छोटी बचती (Small Savings Scheme) द्वारे तुम्ही सुद्धा लाखो रुपयांचा फंड बनवू शकता. होय, या स्कीममध्ये सरकारची गॅरंटी सुद्धा असते. आम्ही येथे PPF स्कीमबाबत सांगत आहोत, जिथे रोज 150 रुपयांच्या हिशेबाने गुंतवणूक केली गेली तर अवघ्या 20 वर्षाच्या नोकरीत अतिरिक्त 20 लाख रुपयांपेक्षा जास्त फंड तुम्हाला मिळेल. एक्सपर्ट सांगतात की, दैनंदिन खर्चातून काही ना काही अनावश्यक खर्च टाळला तर 100-150 रुपयांची बचत केली जाऊ शकते. तसेच, हे पैसे सरकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये (Post Office) टाकले तर याचा मोठा फायदा मिळू शकतो.
जाणून घ्या कसे मिळतील 20 लाख रुपयांपेक्षा जास्त –
जर तुमचे वय 25 वर्ष आहे तर चांगली संधी आहे छोट्या रक्कमेतून मोठे रिटर्न मिळवण्याची. एक्सपर्ट म्हणतात, जर जर तुमचे उत्पन्न 30-35 हजार रुपयांपर्यंत आहे तर इतर बचतीशिवाय सुरुवातीला रोज 100-150 रुपयांच्या हिशेबाने बचत केली जाऊ शकते. ही बचत वयाच्या 45 व्या वर्षी तुम्हाला अतिरिक्त 20 लाख रुपयांपेक्षा जास्त फंड देऊ शकते, ज्यामुळे नोकरी करताना तुम्ही मोठ्या गरजा सहज पूर्ण करू शकता.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
जर तुम्ही 150 रुपये रोजच्या बचतीप्रमाणे पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर ते 4500 रुपये मासिक होतात. दर महिन्याला 4500 रुपये गुंतवणूक केल्यास वार्षिक गुंतवणूक 54 हजार रुपये होईल.
तर, 20 वर्षात एकुण गुंतवणूक 10.80 लाख रुपये होईल. 7.1 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगप्रमाणे यामध्ये तुम्हाला 20 वर्षात सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त रक्कमेचा तयार फंड मिळेल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पीपीएफ अकाऊंटचे फायदे
हे अकाऊंट केवळ 100 रुपयांनी उघडता येऊ शकते. जॉईंट अकाऊंटसुद्धा उघडू शकता.
अकाऊंट उघडताना यामध्ये नॉमिनेशन फॅसिलिटी असते. 15 वर्षाचा मॅच्युरिटी परियड पूर्ण झाल्यानंतर सुद्धा यास दोन वेळा 5-5 वर्षासाठी वाढवू शकता.
याच्यातून मिळणारे उत्पन्न टॅक्स फ्री असते. अकाऊंटवर तिसर्या फायनान्शियल ईयरपासून लोनसुद्धा घेता येऊ शकते.
बँक, पोस्ट ऑफिस तुम्हाला पीपीएफ अकाऊंट उघडण्याची सुविधा देते.
हे अकाऊंट 15 वर्षासाठी उघडू शकता, जे पुढे 5 वर्षासाठी वाढवता येऊ शकते.
सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर आहे, जो वार्षिक कंपाऊंडेड आहे.
पीपीएफमध्ये मिनिमम 100 रुपयांपासून अकाऊंट उघडू शकता.
पीपीएफ अकाऊंटमध्ये एका फायनान्शियलमध्ये किमान 500 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. तर तुम्ही एका वर्षात अकाऊंटमध्ये कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.
Web Titel : Post Office | invest rs 150 in post office small savings scheme ppf public provident fund give rupees 20 lakhs check details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update