खुशखबर ! PPF, NSC, ‘सुकन्या समृध्दी’सह ‘या’ स्कीमध्ये पैसे गुंतवणार्यांची होणार घरबसल्या ‘ही’ सर्व कामे, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ पब्लिक प्रोविडेंट फंड, सुकन्या समृद्धि योजना, एनएससी, एफडी आणि आरडी खाते सुुरु केले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण पोस्ट विभागाने नवी मोबाइल बँकिंग सेवा सुरु केली आहे. पोस्ट ऑफिसकडून संबंधित सूचना देऊन ही घोषणा दिली. या सुविधेमुळे पोस्ट ऑफिसच्या अनेक छोट्या बचत योजना जसे की टाइम डिपॉजिट, किसान विकास पत्र, नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट यांना हाताळणे सोपे जाईल.
पोस्ट ऑफिसमध्ये रांगेत न लागता करता येईल काम –
– पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्याची माहिती मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून खात्यातील शिल्लक रक्कम, एनएससी, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट, कर्ज इत्यादी माहिती तुम्ही मिळवू शकतात.
– बचत खाते आणि पीपीएफसाठी ट्रांजेक्शन हिस्ट्रीसह मिनी स्टेटमेंट पाहिले जाऊ शकते, एका पोस्ट ऑफिस सेविंग्स खात्यातील फंडला दुसऱ्या पोस्ट ऑफिस सेविंग खात्यात ट्रांसफर केले जाऊ शकते.
– बचत खात्यातून आरडी किंवा पीपीएफ खात्यात फंड ट्रांसफर करता येईल.
– मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसमध्ये नवे RD सुरु करणे आणि टाइम डिपॉजिटमध्ये पैसे जमा करणे सोपे होईल.
असे करु शकतात मोबाइल बँकिंग अॅपचा वापर –
1. पोस्ट ऑफिस बचत खात्यातून मोबाइल बँकिंग एक्सेस करण्यासाठी सर्वात आधी खातेदारकांना पोस्ट ऑफिस बचत बँक एटीएम, इंटरनेट, मोबाइल बँकिंग अप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल.
2. जर पोस्ट ऑफिसमध्ये एखाद्या खातेदाराने पहिल्यांदाच केवायसी पूर्ण केले असेल तर हा फॉर्म सबमिट केल्यानंतर पुन्हा एकदा केवायसी करावी लागेल.
3. पोस्ट ऑफिसकडून सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खातेदाराला अॅप डाऊनलोड करुन मोबाइल बँकिंग एक्टिवेट करण्यासाठी सूचित करण्यात येईल.
4. प्रत्येक ग्राहकांसाठी यूनिक राहणारी कस्टमर इनफॉर्मेशन फाइल यांनी CIF यूजर्स आयडी राहिलं. मोबाइल बँकिंग फीचर डिसेबल करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये रिकवेस्ट करावी लागेल.
5. पोस्ट ऑफिसमध्ये मोबाइल बँकिंग सर्विंस CBS (कोर बँकिंग सॉल्यूशन) पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असेल.
6. इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यासाठी अशा पोस्ट ऑफिसमध्ये या सुविधा असणे आवश्यक आहे.
7. सिंगल खातेधारक आणि ज्वाइंट बी प्रकारचे खातेदार सेवेचा लाभ घेऊ शकतील.
8. ज्वाइंट ए किंवा मायनर (अल्पवयीन) खातेदार या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
Visit : Policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी