Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्कीम ! दररोज 50 रुपये गुंतवा अन् मिळवा 35 लाखांचा परतावा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Post Office Investment Scheme | भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office Schemes) वेगवेगळ्या बचत योजना (Post Office Investment Scheme) राबवत आहे. सुरक्षित गुंंतवणूक आणि चांगला परतावा हा पोस्ट ऑफिसमधून मिळतो. त्यामुळे अधिकाधिक लोक याकडे वळताना दिसतात. दरम्यान, अशीच एक पोस्ट ऑफिस योजना म्हणजे, ग्रामसुरक्षा योजना (Gramsuraksha Yojana) आहे. या योजनेसाठी तुम्ही दररोज फक्त 50 रुपयांची बचत करून 35 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकणार आहात. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

अशी करा गुंतवणूक –

पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना (Rural Postal Life Insurance Schemes Program) कार्यक्रमाचा एक भाग आहे.
ही विमा पॉलिसी 1995 साली देशातील ग्रामीण लोकांसाठी सुरू केली गेली.
19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतात.
या योजनेतंर्गत दहा हजार रुपयांपासून 10 लाखांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते.
प्रीमियम भरण्यासाठी यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकणार आहे. (Post Office Investment Scheme)

 

असा मिळेल परतावा –

जर एखाद्या व्यक्तीला या योजनेत दरमाह 1,515 रुपये म्हणजेच, दररोज 50 रुपयांची गुंतवणूक करायची असेल, तर त्यांना तब्बल 35 लाखांचा परतावा मिळू शकतो.
जर तुम्ही ग्रामसुरक्षा योजना वयाच्या 19 व्या वर्षी घेत असाल, तर वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत तुम्हाला 1,515 रुपये प्रीमियम भरावं लागणार आहे.

 

असा मिळवा 35 लाखांचा परतावा –

जर तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत ही योजना घेतली,
तर तुम्हाला प्रतिमहिना 1463 रुपये आणि 60 वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा 1411 रुपये द्यावे लागतील.
तुमचा एखादा प्रीमियम भरायचा चुकल्यास, तुम्ही तो पुढच्या 30 दिवसांच्या आत जमा करू शकणार आहात.
जर तुम्ही या योजनेच्या परताव्यावर नजर टाकली तर, गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31.60 लाख रुपये,
58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांच्या गुंतवणुकीवर 34.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ मिळणार आहे.

 

Web Title :- Post Office Investment Scheme | post office scheme post office gram suraksha yojana per day invest 50 rupees and get 35 lakhs

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा