इथं 124 महिन्यात 100000 बनतील 2 लाख, सहज उघडता येईल अकाऊंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना काळात बँकांचे फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय राहिलेला नाही. कारण आर्थिक मंदीमुळे प्रायव्हेट आणि सरकारी बँकांच्या एफडीच्या व्याजदरात घट झाली आहे. अशावेळी जर चांगला नफा कमवायचा असेल तर किसान विकास पत्र चांगला पर्याय होऊ शकतो. केव्हीपी भारत सरकारद्वारे जारी एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, जेथे ठरलेल्या कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतात. याचा मॅच्युरिटी पीरियड सध्या 124 महीने आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1,000 रुपयांची करता येते. कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

व्याजदर
पोस्ट ऑफिसच्य स्कीममध्ये वार्षिक 6.9 टक्केच्या दराने व्याज मिळते. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहेत. या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुमचे पैसे 124 महिन्यात (10 वर्षे आणि 4 महिने) डबल होतील. उदाहरणार्थ तुम्ही या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केलीत, तर 124 महिन्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील.

कोण करू शकतात गुंतवणूक
किसान विकास पत्रात गुंतवणूक करणार्‍याचे वय किमान 18 वर्षे असणे जरूरी आहे. यामध्ये सिंगल अकाऊंटशिवाय जॉईंट अकाऊंटसुद्धा काढू शकता. ही योजना अल्पवयीनांसाठी सुद्धा आहे. ज्याची देखरेख पालकांना करावी लागते. ही योजना हिंदू विभक्त कुटुंबांना वगळून ट्रस्टसाठी सुद्धा लागू आहे.

असे उघडा खाते
यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून खाते उघडू शकता. याशिवाय फॉर्म आनलाइन सुद्धा डाऊनलोड करता येतो. फॉर्मवर पूर्ण नाव, जन्म तारीख आणि व्यक्तीचा पत्ता लिहावा लागेल. फॉर्ममध्ये पर्चेस अमाऊंटची मात्रा स्पष्ट लिहावी. केव्हीपी फॉर्मची रक्कम रोख किंवा चेकने भरता येते. चेकने पैसे भरल्यास, फॉर्मवर चेकनंबरची माहिती लिहा.