Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत होईल 5000 रूपयांचे मंथली इन्कम, सरकार देते गॅरंटी, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office MIS | पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम सरकारी स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम आहे. यामध्ये गुंतवणुकदाराला दर महिना ठरलेली रक्कम मिळते. पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये कोणत्याही प्रकारचे जोखीम नाही. या स्कीममध्ये किती व्याज मिळते ते जाणून घेवूयात. (Post Office MIS)

 

पोस्ट ऑफिस मंथली स्कीम
योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये सिंगज किंवा जॉईंट अकाऊंट अंतर्गत एकावेळी पैसे जमा केले जातात. वार्षिक मिळणार्‍या व्याजानंतर त्या रक्कमेला दर महिना अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जाते. या योजनेचा लॉक इन पीरियड 5 वर्ष आहे. 5-5 वर्षांसाठी तो पुढे वाढवला जातो.

 

इतके मिळते व्याज
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (Post Office Monthly Income Scheme) 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळते. जर एखाद्या गुंतवणुकदाराने यामध्ये जॉईंट अकाऊंटद्वारे 9 लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे तर वार्षिक 6.6 टक्के दराने 59400 रूपये मिळतील. या प्रकारे व्याजाची मासिक रक्कम 4950 रूपये होते. ती तुम्ही दरमहिना घेवू शकता. ही केवळ व्याजाची रक्कम आहे तुमची मुळ रक्कम तसेच राहील. (Post Office MIS)

किती करू शकता गुंतवणूक
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अंतर्गत सिंगल आणि जॉईंट दोन्ही अकाऊंट उघडता येऊ शकतात. यामध्ये सिंगल अकाऊंटसाठी कमाल 4.5 लाख रुपये आणि जॉईंट अकाऊंटसाठी कमाल 9 लाख रुपये गुंतवणूक शकता.

 

मॅच्युरिटी
या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड पाच वर्षांचा आहे. ती वर्षानंतर बंद करू शकता किंवा पुढे वाढवू शकता. जर मॅच्युरिटीच्या अगोदर अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला तर अकाऊंट बंद होईल आणि पैसे नॉमिनीला दिले जातील.

 

कोण करू शकतात गुंतवणूक
पोस्ट ऑफिस मंथली स्कीममध्ये कुणीही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. कुणीही 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती यात खाते उघडू शकतो.

 

Web Title :- Post Office MIS | post office monthly income scheme gives rupees 5000 monthly income check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | विश्रांतवाडी परिसरात मानलेल्या बहिणीला त्रास दिल्याचा जाब विचारल्याने दोघांचा खून; एकाला ढकलून दिल्याचे पाहिल्याने दुसर्‍यालाही मारले

 

Pune Crime | पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, मॉडेलसह 6 पीडित तरुणींची सुटका

 

Pregnant Woman Diet | प्रेग्नंट महिलांनी 1 ते 9 व्या महिन्यापर्यंत काय खावे? आयुर्वेदात ‘हे’ आहेत परफेक्ट डाएट