मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोस्टाने आता एक नवीन योजना अमलात आणून एक संधी निर्माण केली आहे. नोकरी सोडून आता दुसरं उत्पन्न मिळवण्याचं साधन म्हणून पोस्टाची मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme) व्यक्तीसाठी सर्वोत्तम पर्याय उपलब्द्ध केला आहे. पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत पती-पत्नीला डबल फायदाही मिळू शकतो. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत उपयोगी आहे. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेच्या अंतर्गत दरमहा पैसे मिळविण्याची संधी मिळणार आहे.
तर यामध्ये संयुक्त खाते (Joint account) उघडण्याची सुविधाही आहे. तसेच मासिक उत्पन्न योजनेच्या संयुक्त खात्याद्वारे नफा हा दुप्पट होऊ शकतो. आणि
वैयक्तिक खाते उघडताना या योजनेत किमान १००० आणि जास्तीत जास्त ४ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक करु शकता. किंवा संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. तर ५९ हजार ४०० रुपयांची वार्षिक कमाई होऊ शकते
तर ५९ हजार ४०० रुपयांची वार्षिक कमाई होऊ शकते.
मासिक उत्पन्न योजनेमध्ये महत्वाची बाब म्हणजे २ किंवा ३ लोक संयुक्त खाते उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक खातेदारास समान दिले जाते. जर आवश्यक असेल तर संयुक्त खाते केव्हाही एकाच खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकते. वैयक्तिक खातेही संयुक्त खात्यात रूपांतरित करतात. खात्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी सर्व खाते सदस्यांचा संयुक्त अर्ज द्यावा लागतो. तर मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास सध्या वार्षिक व्याज दर ६.६ टक्के आहे. योजनेंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानुसार परताव्याचं गणना केली जाते.यामध्ये आपले एकूण परतावे वार्षिक आधारावर आहेत. म्हणून, दर महिन्याला हे १२ भागात विभागले गेले आहे. आपण प्रत्येक महिन्यात आपल्या खात्यात एक हिस्सा मागू शकता. जर आपल्याला महिन्याला या रकमेची आवश्यकता नसेल तर ही रक्कम तुम्ही मूळ रकमेला जोडल्यास त्यावर व्याजही मिळू शकतो.