नवी दिल्ली : वृत्त संस्था – सध्याच्या काळात एखाद्या व्यक्तीची कमाई सॅलरीतून असो किंवा बिझनेसमधून, त्यास जास्त इन्कमची गरज असतेच. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम (पीओ एमआयएस) एक चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने जॉईंट खाते उघडले तर यातून होणारी कमाई दुप्पट होते. या संधीचा लाभ तुम्ही सुद्धा घेऊ शकता.
टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंटचा विचार केल्यास हा पर्याय चांगला आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेक लोकांची नोकरी गेली आहे, तर काहींच्या पगारात कपात झाली आहे. मात्र, या योजनेचा लाभ निवृत्त लोकांसाठी होता, परंतु त्याचा अर्थ असा नाही की, हा लाभ केवळ सिनियर सिटीझन्सला मिळू शकतो.
जॉईंट खात्यात 9 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्याची संधी
ही योजना त्यांच्यासाठी चांगली आहे ज्यांना वन टाइम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर रेग्यूलर इन्कम हवे आहे. या योजनेंतर्गत एक व्यक्ती 4.5 लाख रुपयांपर्यंत वन टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकते. मात्र, जॉईंट खात्यांतर्गत हे लिमिट 9 लाख रुपयांचे होते. जॉईंट खाते पती, पत्नी एकत्र उघडू शकतात.
अशी होईल दर महिन्याला 5 हजार कमाई
सध्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर 6.6 टक्के व्याजदर मिळतो. याचा अर्थ आहे की, त्या व्यक्तीस वार्षिक 29,700 रुपयांचा लाभ होईल. मात्र, जॉईंट खाते उघडणे आणि 9 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर हे रिटर्न दुप्पट होऊन 59,400 रुपये होईल. जर आपण हे 12 महिन्यात विभागले तर प्रत्येक महिन्याला रिटर्नम्हणून 4,950 रुपये मिळू शकतात. जर आपण रिटर्न विड्रॉ केले नाही आणि वार्षिक 59,400 रुपये व्याजाची रक्कम खात्यात ठेवून दिली, तर यावर सुद्धा जास्त व्याज मिळू शकते.
इन्व्हेस्टर्स या रक्कमेवर व्याज प्राप्त करतील आणि त्यांना कम्पाऊंडिंगचा लाभ मिळू शकतो. अशाप्रकारे 6.6 टक्के दराने 59,400 रुपयांवर सुद्धा तुम्हाला वार्षिक 3,920.40 रुपयांचे व्याज मिळेल. पुढील दोन वर्षात 9 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट वाढवून 9,63,320.40 रुपये होईल.
हे उघडू शकतात खाते
तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने सुद्धा खाते उघडू शकात. जर मुलगा 10 वर्षांचा असेल तर त्याच्या नावावर, त्याचे आई-वडील खाते उघडू शकतात. मुलगा प्रौढ झाल्यानंतर त्याला खात्याची जबाबदारी मिळू शकते.
असे उघडा खाते
तुम्ही तुमच्या सुविधानुसार कोणत्याही पोस्ट खात्यात जाऊन खाते उघडू शकता. यासाठी आधार कार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सपैकी एकाची फोटो कॉपी जमा करावी लागेल. याशिवाय अॅड्रेस प्रूफ जमा करावा लागेल, ज्यामध्ये ओळखपत्र सुद्धा उपयोगी पडू शकते. याशिवाय 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ जमा करावे लागतील.