‘या’ सरकारी स्कीमव्दारे दरमहा घरबसल्या करू शकता ‘कमाई’, यासंबंधीचे 10 महत्वाचे मुद्दे जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छोट्या प्रमाणात बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिसने मंथली इनकम योजना देखील सुरु केलेली आहे. या योजनेनुसार तुम्ही छोट्या किमतीपासून देखील बचत करायला सुरुवात करू शकता. यामुळेच संपूर्ण देशात ही योजना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेली आहे. या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका किंवा रिस्क नाही.

जेष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेमध्ये पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. व्यक्तिगत पातळीवर या योजनेमध्ये 4.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते. जर जॉइंट स्वरूपात या योजनेमध्ये गुंतवणूक करणार असाल तर, 9 लाख रुपयांपर्यंत करू शकता. यावर 7.6 % व्याज मिळेल जे की, वार्षिक स्वरूपाचे असेल.

1) ही एक फिक्स इनकम योजना आहे. गुंतवणूक दराने केलेल्या गुंतवणुकीवर सुरु असलेल्या वातावरणाचा कोणताही प्रभाव पडत नाही. कारण सरकारद्वारे या योजनेला संरक्षित केले जाते.

2) पोस्ट ऑफिसच्या महिन्याच्या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. कालावधी पूर्ण झाल्यानंतर रक्कम काढून घेता येते आणि पुन्हा एकदा रिइन्व्हेस्ट केली जाऊ शकते.

3) या योजनेमध्ये कमीतकमी 1 हजार रुपये गुंतवणूक केली जाते. नंतर आपल्या सोयीनुसार यात वाढ देखील करता येते.

4) पोस्ट ऑफिसची ही मासिक उत्पन्न योजना आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत समाविष्ट केलेली नाही. अशा परिस्थितीत त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरला जातो. तथापि, त्यावर कोणताही टीडीएस कट होत नाही.

5) गुंतवणूकीच्या पहिल्या महिन्यापासून गुंतवणूकदाराला पे आऊट मिळणार आहे. तथापि, आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की, पे आऊट केवळ प्रत्येक महिन्याच्या शेवटी उपलब्ध असतात. महिन्याच्या सुरुवातीला नाही.

6) या योजनेनुसार मिळालेली रक्कम महागाईपासून सूट मिळण्यासाठी मदत करत नाही. मात्र FD तसेच इतर फिक्स योजनांच्या बाबतीत यामध्ये अधिक व्याज मिळते.

7) कोणी एक व्यक्ती आपल्या नावावर एका पेक्षा अधिक खाती उघडू शकतो. एवढे असूनही जास्तीत जास्त 4.5 लाखांपर्यंतच गुंतवणूक करता येते.

8) या योजनेसाठी तीन लोक मिळून ज्वाईन्ट खाते देखील सुरु करू शकतात. आणि यातून मिळणारे पैसे हे तीन लोकांसाठीच असतील.

9) 10 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीच्या नावे देखील, खाते सुरु करता येऊ शकते. मात्र वय 18 पेक्षा जास्त झाल्यानंतरच या खात्याला ऍक्सिस करता येऊ शकते. आणि यामध्ये 3 लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक नसली पाहिजे.

10) गुंतवणूकदार आपल्या परिवारातील कोणालाही व्यक्तीची वारसदार म्हणून निवड करू शकतो. आणि भविष्यात ती व्यक्ती याबाबतचा क्लेम करू शकतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/