Post Office News | 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी ! अनेक पदांसाठी भरती अन् 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Post Office News | भारतीय पोस्ट विभागाने (Indian Postal Department) अनेक पदांवर भरती काढली आहे. भारतीय पोस्ट विभागाच्या पंजाब सर्कलने पोस्ट असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफच्या कॅडरमध्ये व्हॅकन्सी काढली आहे. जर तुम्हाला यापैकी एखाद्या जागेसाठी अर्ज करायचा असेल तर इंडिया पोस्टची अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन ऑनलाइन अप्लाय करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख (Deadline) 18 ऑगस्ट 2021 आहे. Post Office News | employment news vacancies for many posts in post office know how can you apply if you are 10th or 12th pass

उमेदवार थेट https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx वर व्हिजिट करून अप्लाय करू शकतात. जर नोटिफिकेशन पहायचे असेल तर https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_09072021_Punjab.pdf लिंक वर पाहू शकता. पोस्ट विभागात एकुण 57 पदांवर भरती केली जाईल.

कोणत्या पदावर किती व्हॅकन्सी

पोस्ट विभागाच्या पंजाब सर्कलमध्ये पोस्टल असिस्टंटसाठी 45 पदावर नियुक्ती केली जाणार आहे.
तर, सॉर्टिंग असिस्टंटसाठी 9 पदे रिक्त आहेत.
याशिवाय मल्टी टास्किंग स्टाफच्या 3 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता

पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 12वी किंवा त्या समकक्ष शिक्षण असावे.
सोबतच अर्जदाराला कम्प्युटरचे बेसिक ज्ञानाचे सर्टिफिकेटसुद्धा मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळालेले असावे. मल्टी-टास्किंग स्टाफसाठी 10वी पास असणे आवश्यक आहे.
सोबतच स्थानिक भाषेचे ज्ञान अतिशय आवश्यक आहे.

अर्जदाराचे वय 27 वर्षापर्यंत असावे

पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंटसाठी अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्ष असावे.
तर, मल्टी टास्किंग स्टाफसाठी 18 ते 25 वर्ष असावे.
नियमानुसार आरक्षित गटातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल.

वेतन

असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट पदासाठी वेतन 25500- 81100 रुपयांपर्यंत दिले जाईल.
तर, मल्टी टास्किंग स्टाफच्या कँडिडेट्सला 18000 ते 56900 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

Web Title : Post Office News | employment news vacancies for many posts in post office know how can you apply if you are 10th or 12th pass

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PGCIL Apprentice Recruitment 2021 | पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये 1110 पदांची भरती, परीक्षेशिवाय नियुक्ती; जाणून घ्या सविस्तर

MMRDC | ठाणेकरांसाठी खुशखबर ! ठाणे ते बोरिवलीचा प्रवास लवकरच होणार अवघ्या 15 मिनिटात

Porn Film Case मध्ये पती राज कुंद्राच्या अटकेने अस्वस्थ झालेल्या शिल्पा शेट्टीनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल