Post Office NSC Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत चांगल्या व्याजासह मिळते करात सवलत, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Post Office NSC Scheme | पोस्ट ऑफिस (Post Office) हे नेहमीच गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग राहिले आहे, लोकांसाठी येथे गुंतवणूक करणे देखील सोयीचे आहे. कारण पोस्ट ऑफिसच्या शाखा शहरांसह ग्रामीण भागात सुद्धा पसरलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना पोस्ट ऑफिसपर्यंत पोहोचणे खूप सोपे झाले आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला चांगल्या व्याजासह करात सूट हवी असेल तर पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत योजना हा एक चांगला पर्याय असू शकतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही या योजनेत गुंतवणूक केली आहे. NSC योजनेबद्दल जाणून घेऊया. (Post Office NSC Scheme)

किती सुरक्षित आहे NSC ?

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate) स्कीममध्ये गुंतवणूक करताना शून्य धोका असतो. तुम्ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक योजना शोधत असाल, तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. कारण हा पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेचा भाग आहे आणि त्यात केलेल्या गुंतवणुकीलाही करात सूट मिळते.

NSC मध्ये कशी करावी गुंतवणूक –

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा किमान लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. म्हणजे तुम्ही केलेली गुंतवणूक 5 वर्षांपर्यंत काढता येणार नाही. NSC मध्ये तीन प्रकारे गुंतवणूक करता येते. ज्यामध्ये स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी गुंतवणूक करू शकता. तसेच कुणीही दोन लोक एकत्र गुंतवणूक करू शकतात आणि तिसर्‍या पर्यायामध्ये दोन लोक एकत्र गुंतवणूक करतात परंतु मॅच्युरिटीवर पैसे फक्त एका गुंतवणूकदाराला दिले जातात. (Post Office NSC Scheme)

किती करू शकता गुंतवणूक ?

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये 6.8 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. या योजनेत रु. 100 च्या पटीत गुंतवणूक करता येते. एनपीएसमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही.

करात मिळते सवलत –

NSC मध्ये गुंतवणूक केल्यास प्राप्तीकर कलम 80 सी नुसार प्रतिवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते. जेथे करपात्र उत्पन्न असेल तर एकूण उत्पन्नातून रक्कम वजा केली जाते.

Web Title : Post Office NSC Scheme | post office nsc scheme good interest and tax exemption available

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’