Post Office च्या ‘या’ योजनांचा घरबसल्या घ्या लाभ, ही आहे अतिशय सोपी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office | डिजिटल युगात ऑनलाइनचा कल वाढत आहे. आतापर्यंत अशा अनेक पॉलिसी आहेत ज्या ऑनलाइन मिळू लागल्या आहेत. यामुळे कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागत नाहीत. पोस्ट ऑफिसने किसान विकास पत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट सारख्या योजनांसाठी ऑनलाइन सर्व्हिस सुरू केली आहे. घरबसल्या या योजनांचा फायदा घेता येऊ शकतो. मात्र, यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. (Post Office)

 

डीओपीची घ्यावी लागेल सुविधा
मीडिया रिपोर्टनुसार, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट बँकिंग आवश्यक आहे. एनएससी किंवा केव्हीपी अकाऊंट उघडण्यापूर्वी अगोदर डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंटरनेट बँकिंगची सुविधा घ्यावी लागेल. पोस्ट विभागाच्या डीओपी इंटरनेट बँकिंगचा वापर करणारे खातेधारक घरबसल्या एनएससी आणि केव्हीपी अकाऊंट उघडू शकतात. या सुविधेंतर्गत अकाऊंट उघडणे किंवा बंद करण्यासाठी सर्व्हिस रिक्वेस्ट ऑफ जनरल सर्व्हिसेस ऑप्शनमध्ये जावे लागेल. यानंतर एनएससी आणि केव्हीपी अकाऊंटचे ऑप्शन येईल. (Post Office)

 

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट National Saving Certificate (NSC)
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये किमान 1000 रूपये गुंतवू शकता. यामध्ये कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. यामध्ये गॅरंटीसह रिटर्न मिळतो. एनएससीचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा असतो. यावर सध्या 6.8 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे, जे एफडीपेक्षा जास्त आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या सेक्शन 80सी अंतर्गत टॅक्स सूट मिळते. मात्र, ही सूट 1.5 लाख रूपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवरच मिळते.

किसान विकास पत्र Kisan Vikas Patra (KVP)
या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड सध्या 124 महिने आहे. यामध्ये किमान 1000 रूपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. विशेषकरून हा प्लान शेतकर्‍यांसाठी बनवण्यात आला आहे,
जेणेकरून ते दिर्घकालावधीत आपल्या पैशांची बचत करू शकतील.
केव्हीपीसाठी आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत व्याजदर 6.9 टक्के ठरवण्यात आला आहे. येथे तुमची गुंतवणूक 124 महिन्यात डबल होते.

 

Web Title :- Post Office | post office national saving certificate and kisan vikas patra account open close online check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PPF खातेधारकांसाठी भारतीय पोस्ट देत आहे मोठी सुविधा, घरबसल्या करू शकता हे काम

 

Aurangabad Crime | ‘बायकोला सोड अन् माझ्याशी लग्न कर’, प्रेयसीच्या तगाद्याला वैतागून विवाहित तरूणानं उचललं टोकाचं पाऊल

 

High Court | पत्नीची देखभाल करणे कायदेशीर प्रकारे पतीची जबाबदारी, HC ने फेटाळली याचिका