आता पोस्ट ऑफिसमध्ये देखील मिळेल सुरक्षा विमा; 50 लाखांपर्यंत कव्हरेज अन् कर्जासह बरेच फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा यासाठी पोस्ट ऑफिसच्या(Post office) विविध योजना लोकप्रिय आहेत. बहुतांश नागरिक पोस्ट ऑफिसच्या(Post office) योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. यात जोखीम कमी असते आणि सरकारी गॅरंटी देखील मिळते. दरम्यान याशिवाय पोस्ट ऑफिसकडून वीमा योजना देखील ऑफर केली जात आहे. पोस्टल लाइफ इन्शुरन्स अर्थात डाक जीवन वीमा दिला जात आहे. याचे विविध फायदे तुम्हाला मिळू शकतात. विशेष म्हणजे तुम्ही याअंतर्गत 50 लाखापर्यंत कव्हरेज मिळवू शकता.

Pune : ‘पती-पत्नी और वो’ ! बालगंधर्व चौकात डेक्कन पोलिसांनी अडवली कार; प्रकरण गेलं घटस्फोटापर्यंत, पत्नी म्हणाली – ‘आता नातेवाईकांनाच बोलावते अन्…’

पोस्ट ऑफिसमध्ये 2 कॅटेगरीअंतर्गत वीमा सुरक्षा दिली जाते. PLI आणि RPLI. दरम्यान PLI अंतर्गत 6 पॉलिसी मिळतात. यात एक Whole life insurance ही पॉलिसी देखील प्रदान केली जात आहे.

उन्हाळ्यात आंबा लस्सी पिऊन शरीर आणि मन दोन्ही Cool ठेवा

या पॉलिसीतील महत्त्वाचे मुद्दे

या योजनेत कमीतकमी सम अश्योर्ड: 20000 रुपये आणि जास्तीत सम अश्योर्ड: 50 लाख रुपये आहे. सुरुवातीला हा विमा केवळ सरकारी आणि निम्न सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होता. पण आता हा इन्शुरन्स डॉक्टर, इंजीनिअर, मॅनेजमेंट कंसल्टंट, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, वकील, बँकर्स आणि कर्मचारी याकरिता शिवाय NSE आणि BSE लिस्टेड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील मिळतो. PLI होल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी काढण्यासाठी अर्जदाराचे वय कमीतकमी 19 आणि जास्तीत जास्त 55 असणे आवश्यक आहे. https://pli.indiapost.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन विमा काढू शकता.

Pune : कोलकत्ता नाईट रायडर संघातील राहुल त्रिपाठीला पुणे पोलिसांकडून ‘फाईन’; वसूल केला 500 रूपयांचा दंड

Whole life insurance अंतर्गत मिळणारे फायदे

1) तुम्हाला कर्जाची सुविधा मिळेल

2) पॉलिसीची 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही कर्जाची सुविधा मिळेल

3) पॉलिसी बंद करायची असेल तर 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरेंडर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

4) इन्शुरन्स काढणाऱ्या व्यक्तीला बोनससह 80 वर्ष वयात एक अश्योर्ड अमाउंट देखील मिळते

5) याआधी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास ही रक्कम नॉमिनीला दिली जाते

ब्लड सर्कुलेशन चांगले बनवायचे असेल तर आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या

SSR Death Case : सुशांतसिंह राजपूतच्या जवळच्या मित्राला हैदराबादमधून अटक, NCB ची माहिती

सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी बनवलेले सनस्क्रीन लोशन वापरा, जाणून घ्या