Post Office PPF Scheme | 35 व्या वर्षापासून करा दरमहिना 5 हजार रुपयांची गुंतवणूक, निवृत्तीला मिळेल 41 लाखांचा फंड, जाणून घ्या संपूर्ण कॅलक्युलेशन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office PPF Scheme | पोस्ट ऑफिस सेवानिवृत्ती आणि त्यापूर्वीच्या आयुष्यासाठी अनेक गुंतवणूक योजना चालवते. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी चांगली रक्कम तयार करू शकता. तुम्हालाही तुमच्या सेवानिवृत्तीबद्दल काळजी वाटत असेल, तर पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना (Post Office PPF Scheme) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
कारण या योजनेत एक लहान ठेव दीर्घकाळासाठी मोठा निधी तयार करू शकते. ज्यामध्ये प्राप्तीकरात सूटही मिळते. वयाची 35 वर्षे ओलांडल्यानंतरही तुम्ही निवृत्तीपर्यंत मोठा निधी कसा जमा करू शकता, ते जाणून घेवूयात…
25 वर्षात 41 लाखांचा निधी येणार –
पोस्ट ऑफिसमधील PPF खात्यात तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपये गुंतवू शकता. ज्यावर वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते. वयाच्या 35 व्या वर्षापासून तुम्ही मासिक 5 हजार रुपये गुंतवले तर एका वर्षात 60000 हजार रुपयांची गुंतवणूक होईल.
तर PPF मध्ये मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, जो 5-5 वर्षांसाठी दोनदा वाढवता येतो. अशा स्थितीत, 25 वर्षांत तुमच्या खात्यात जमा होणारी मुद्दल + व्याजाची रक्कम 41,23,206 लाख रुपये असेल. यामध्ये 15 लाख गुंतवणूक आणि 26.23 लाख व्याज मिळणार आहे. (Post Office PPF Scheme)
पीपीएफमध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित –
अनेकांना गुंतवणूक करण्यापूर्वी सुरक्षिततेची काळजी असते. परंतु, पीपीएफमध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते.
पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त, तुम्ही बँकेत पीपीएफ खाते (PPF Account) देखील उघडू शकता. जिथे तुम्हाला समान व्याज मिळेल.
या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ती प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत कर लाभ प्रदान करते.
योजनेतील 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर डिडक्शन घेता येऊ शकते.
पीपीएफमध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम सुद्धा करमुक्त आहे.
अशा प्रकारे, PPF मधील गुंतवणूक EEE श्रेणीत येते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकार ही अल्पबचत योजना प्रायोजित करते.
त्यामुळे ग्राहकांना यामध्ये गुंतवणुकीवर पूर्ण संरक्षण मिळते.
Web Title :- Post Office PPF Scheme | post office start investing 5 thousand rupees every month from the age of 35 you get a fund of 41 lakhs on retirement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rajinikanth | मुलीच्या घटस्फोटामागोमाग सुपरस्टार रजनीकांत यांना आणखी एक धक्का