India Post Recruitment : 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! पोस्ट ऑफिसमध्ये विना परीक्षा 3679 पदांसाठी भरती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : भारतीय डाक विभागात (India Post) ग्रामीण डाक सेवकांच्या 3650 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डाक विभागात या भरती अंतर्गत आंध्र प्रदेश पोस्टल सर्कल, दिल्ली पोस्टल सर्कल आणि तेलंगणा पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण 3679 पदांची नेमणूक केली जाणार आहे. जीडीएस पदांच्या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट appost.in वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदांची संख्या

– आंध्र प्रदेश पोस्टल सर्कल (Andhra Pradesh Circle) – 2296 पदे
– दिल्ली पोस्टल सर्कल (Delhi Circle) – 233 पदे
– तेलंगणा पोस्टल सर्कल (Telangana Circle) – 1150 पदे

शैक्षणिक पात्रता

इंडिया पोस्ट भर्ती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था/ बोर्डामधून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा

डाक विभागात जीडीएसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त वय 40 वर्षे निश्चित केले गेले आहे.

अर्जाचे शुल्क

पोस्टल सर्कलमधील जीडीएसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

कशी केली जाईल निवड?

डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी उमेदवारांची निवड 10वी च्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. जीडीएस पदांच्या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत देण्याची गरज नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख?

भारतीय डाक विभागा (India Post) च्या आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि दिल्ली सर्कल मध्ये जीडीएस (GDS) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ appost.in वर भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे.