Post Office | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत रोज 417 रुपये गुंतवा, व्हाल करोडपती; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Post Office | पोस्ट ऑफिस (Post Office) चा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट (long term investment) आहे. याचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा (maturity period 15 years) आहे. हा कालावधी तुम्ही पाच-पाच वर्षांसाठी आणखी वाढवू शतका. पीपीएफ (PPF) स्कीममध्ये वार्षिक 7.1 टक्के व्याजासह कंपाऊंडिंगचा सुद्धा लाभ मिळतो. यामध्ये तुम्ही एक वर्षात 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. येथे तुमचे पैसे पूर्ण सुरक्षित राहतात आणि गॅरेंटेड रिटर्न मिळते. यामध्ये जमा केलेली 1.5 लाख रुपयांची रक्कम टॅक्स फ्री (tax free) असते.

असे व्हा करोडपती (Become a millionaire)

15 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी किती गुंतवणुक करावी लागेल आणि व्याजाच्या हिशेबाने किती रक्कम मिळेल जाणून घेवूयात.

एका दिवसात 416 रुपये, कमाल मासिक 12500 रुपये आणि वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील.

7.1 टक्केच्या वार्षिक व्याजाने कंपाऊंडिंग लाभ मिळेल.

एकुण गुंतवणूक 15 वर्षानंतर 22.50 लाख रुपये होईल.

ज्यावर व्याज 18.18 लाख रुपये होईल.

एकुण रक्कम 40.68 लाख रुपये होईल.

जर 25 वर्षापर्यंत केली गुंतवणूक…

जर तुम्ही मॅच्युरिटी कालावधीच्या पुढे 5-5 वर्ष म्हणजे 10 वर्ष स्कीम एक्सटेंड केली तर तुमची रक्कम 1 कोटीपर्यंत पोहचण्यास मदत होईल. कशी ते पाहुयात.

एका दिवसात 416 रुपये, कमाल मासिक 12500 रुपये आणि वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील.

7.1 टक्केच्या वार्षिक व्याजाने कंपाऊंडिंग लाभ मिळेल.

एकुण गुंतवणूक 25 वर्षानंतर 37.50 लाख रुपये होईल.

ज्यावर व्याज 65.58 लाख रुपये होईल.

एकुण रक्कम 1.03 कोटी रुपये होईल.

 

Web Title : Post Office | Rs 417 invested daily post office ppf scheme will become crorepati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Online Search | सावधान ! ऑनलाइन सर्च करताय? ‘बॅड बॉट्समुळे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या

Pune Crime | हॉटेलचालकाकडून 6 लाखांची खंडणी उकळणार्‍याला अटक

Gravittus Foundation | तृतीयपंथीयांच्या मदतीसाठी उषा काकडे यांच्या ‘ग्रॅविटस’ संस्थेचा पुढाकार