Post Office Saving Account | पोस्ट ऑफिसमध्ये असेल सेव्हिंग अकाऊंट, तर तुम्हाला होईल फायदा; 1 जूनपासून सुरू होतेय विशेष सेवा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट (Post Office Saving Account) होल्डरसाठी चांगली बातमी आहे. आता पोस्ट ऑफिसचे ग्राहक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करू शकाल. आता ग्राहकांना आरटीजीएसची सुविधा 31 मे 2022 पासून मिळू लागेल. म्हणजे 1 जूनपासून ग्राहक नवीन सेवेचा लाभ घेऊ शकतील. ग्राहकांना पोस्ट ऑफिस खात्यातून पैसे ऑनलाइन पाठवणे पहिल्यापेक्षा जास्त सोपे होईल.
पोस्ट ऑफिसने जारी केले नोटिफिकेशन
पोस्ट ऑफिसने आपल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, एनईएफटी सर्व्हिस 18 मेपासून सुरू झाली आहे. तर, आरटीजीएसची सर्व्हिस ग्राहकांना 31 मे 2022 पासून मिळण्यास सुरूवात होईल. आता आरटीजीएसच्या सर्व्हिसवर टेस्टिंग सुरू आहे. या सुविधेमुळे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट होल्डर्सला लाभ होईल कारण ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणे सोपे होईल.
ऑनलाइन फंड ट्रान्सफर करणे म्हणजे एनईएफटी वर द्यावा लागेल इतका चार्ज
– 10 हजार रूपयांसाठी – 2.50 रूपये आणि जीएसटी
– 10 हजारपासून 1 लाख रूपयांपर्यंत – 5 रूपये आणि जीएसटी
– 1 लाख रूपयांपासून 2 लाख रूपयांपर्यंत – 15 रूपये आणि जीएसटी
– 2 लाख रूपयांवरील ट्रांजक्शनवर – 25 रूपये आणि जीएसटी
Web Title :- Post Office Saving Account | post office saving account holder benefited rtgs service will start from 31 may
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update