Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा दरमहा केवळ ‘इतक्या’ रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळतील 1 कोटीपेक्षा जास्त रुपये; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना (Post Office Saving Scheme) तुमच्यासाठी योग्य आहेत. येथे पैसे सुरक्षित मानले जातात. येथे तुमच्या सोयीनुसार तुम्ही गुंतवणूक (Post Office Saving Scheme) करू शकता. पोस्टाच्या अशा काही योजना आहेत ज्यांच्यात चांगला नफा मिळतो. विशेषता पोस्टाच्या बचत योजनांमध्ये पैसे जमा करणे चांगला पर्याय आहे.

 

या योजनांमध्ये छोट्यापासून मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते.
जर तुमच्याकडे मोठ्या कालावधीची गुंतवणूक रणनिती असेल तर तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करू शकता.
यामध्ये एफडी आणि आरडीपेक्षा जास्त व्याज मिळते. 2021- 22 साठी व्याजदर 7.1 टक्के दिले जात आहे.
यामुळे जर तुम्ही गुंतवणूक केली तर काही वर्षातच लाखोचा फंड तयार होईल. या योजनेची मॅच्युरिटी 15 वर्षासाठी आहे. परंतु तुम्ही ती पाच-पाच वर्ष पुढे वाढवू शकता.

 

या योजनेत 1.50 लाख रुपये वार्षिक जमा करू शकता किंवा दरमहिना 12500 रुपयांची गुंतवणूक करू शकता.
टॅक्स अ‍ॅक्ट 80सी अंतर्गत इन्कम टॅक्स सवलतीचा लाभ घेऊ शकता. जर दरमहिना 12,500 ची गुंतवणूक केली तर वार्षिक 1.50 लाख रुपये होतात आणि 15 वर्षात गुंतवणूक 22.50 लाख रुपये होते तर एकुण मॅच्युरिटी अमाऊंट 40.70 लाख होईल. (Post Office Saving Scheme)

 

15 वर्षात 40 लाखापेक्षा जास्त फंड

 

या योजनेची मॅच्युरिटी 15 वर्षासाठी आहे. जर दरमहिना 12,500 ची गुंतवणूक केली तर वार्षिक 1.50 लाख रुपये होतात आणि 15 वर्षात गुंतवणूक 22.50 लाख रुपये होते तर एकुण मॅच्युरिटी अमाऊंट 40.70 लाख होईल.

 

25 वर्षापर्यंत जमा केल्यास…

 

जर तुम्ही मॅच्युरिटी कालावधीच्या पुढे 5-5 वर्ष म्हणजे 10 वर्ष स्कीम एक्सटेंड केली तर तुमची रक्कम 1 कोटीपर्यंत पोहचण्यास मदत होईल.
कशी ते पाहुयात. एका दिवसात 416 रुपये, कमाल मासिक 12500 रुपये आणि वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील.

 

7.1 टक्केच्या वार्षिक व्याजाने कंपाऊंडिंग लाभ मिळेल. एकुण गुंतवणूक 25 वर्षानंतर 37.50 लाख रुपये होईल.
ज्यावर व्याज 65.58 लाख रुपये होईल. एकुण रक्कम 1.03 कोटी रुपये होईल. (Post Office Saving Scheme)

 

Web Title : Post Office Saving Scheme | invest rs 12000 every month in this scheme of post office on maturity you will get more than one crore rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Central Government Employees | लाखो सरकारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना मिळणारी ‘ही’ सुविधा 8 नोव्हेंबरपासून बंद; जाणून घ्या नवीन नियमावली

Cyber Crime Prevention Tips & Tricks | ‘या’ 5 पद्धतीने ठेवा आपला फोन सुरक्षित, सायबर गुन्हेगारीसारखी समस्या राहील दूर

Body Detoxification Tips | दिवाळीचा ‘फराळ’, ‘मिठाई’नं ‘आरोग्य’ बिघडवलंय का? ‘या’ 8 पद्धतीने बॉडी करा ‘डिटॉक्स’