Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 3 स्कीम करतात तुम्हाला ‘मालामाल’, मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत राहतील आनंदी; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Saving Scheme | आपण आपला पैसा तिथे गुंतवतो (Invest), जिथे उत्तम रिटर्नसह, पैसे सुरक्षित राहण्याची गॅरंटी आहे. भारतीय पोस्ट ऑफिस अशा गुंतवणूकदारांसाठी अनेक योजना (Post Office Saving Scheme) चालवते, ज्यामध्ये कमी पैसे गुंतवून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता.
तसेच, तुमचे पैसे देखील येथे पूर्णपणे सुरक्षित असतात. या कारणास्तव, काही पोस्ट ऑफिस बचत योजना खूप लोकप्रिय आहेत.
1. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड Public Provident Fund (PPF)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही गुंतवणुकीसाठी उत्तम योजना आहे. या योजनेत तुम्ही एका वर्षात किमान 500 ते 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीच्या रकमेवर 7.1 टक्के व्याज (Interest Rate) मिळेल.
या योजनेत, दर तीन महिन्यांनी चक्रवाढ आधारावर व्याज दिले जाते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचा लॉक इन कालावधी 15 आहे. मात्र, तुम्ही तो आणखी पाच वर्षांसाठी वाढवू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. (Post Office Saving Scheme)
या योजनेत, तुमचे पैसे 120 महिन्यांत दुप्पट होतील आणि त्यात गुंतवणूक केल्यास प्राप्तीकर कलम 80 सी अंतर्गत सूट मिळते.
2. ज्येष्ठ नागरिक बचत योजना Senior Citizen Savings Scheme (SCSS)
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. मात्र, काही अटींसह सेवानिवृत्त कर्मचार्यांसाठी या योजनेत गुंतवणूक करण्याचे वय 55 वर्षे ठेवण्यात आले आहे.
त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचार्यांसाठी (Government Retired Employee’s) काही अटींसह हे वय 50 वर्षे ठेवण्यात आले आहे. या योजनेत गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपये आहे. यामध्ये 7.4 टक्के दराने व्याज मिळते आणि ते तीन महिन्यांच्या आधारावर दिले जाते.
या योजनेतील गुंतवणुकीला प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत सूट मिळते.
3. सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY)
सुकन्या समृद्धी योजना (SSY) मुलींसाठी आहे. या योजनेवर सरकार दरवर्षी 7.6 टक्के दराने व्याज देत आहे.
सुकन्या समृद्धी योजना (SSY) योजनेअंतर्गत, 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक तिचे खाते उघडू शकतात.
या योजनेअंतर्गत, जमा करता येणारी किमान रक्कम 250 रुपये आणि कमाल रक्कम 1.5 लाख रुपये आहे.
खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनंतर किंवा मुलीचे वय 18 झाल्यानंतर तिच्या विवाहाच्या वेळी सुकन्या समृद्धी खाते मॅच्युअर होते.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते.
Web Title :- Post Office Saving Scheme | post office saving scheme ssy scss ppf best profit in less investment
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update