Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवून बनू शकता ‘लखपती’, जाणून घ्या गणित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना (Post Office Saving Scheme) आहेत, ज्या इतर कोणत्याही सरकारी योजनांपेक्षा जास्त रिटर्न देत आहेत. तुम्ही या योजनांमध्ये पैसे लावून चांगला नफा कमावू शकता. पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये जास्त रिटर्न (Post Office Saving Scheme) मिळेल आणि पैसेही सुरक्षित राहतील.
दरवर्षी 5.8 टक्के दराने व्याज
Post Office ची स्कीम बाजारासोबत लिंक्ड नसते, ज्यामुळे रिटर्नबाबत कोणतीही जोखीम नसते. यामुळे सुरक्षित प्रकारे एक ठराविक रिटर्न मिळत राहील. पोस्ट ऑफिसची आवर्ती बचत म्हणजे रिकरिंग डिपॉझिट- आरडी खाते (Recurring Deposit Account) अशीच एक योजना आहे. या लोकप्रिय योजनेत दरवर्षी 5.8 टक्के दराने व्याज मिळते.
दिर्घ मुदतीची चांगली योजना
आवर्ती जमा खाते किंवा रिकरिंग डिपॉझिट किंवा आरडी खाते (RD- Recurring Deposit Account) फिक्स्ड डिपॉझिट आणि दिर्घ कालावधीच्या योजनांपैकी एक चांगला पर्याय मानला जातो. (Post Office Saving Scheme) रिकरिंग डिपॉझिटमध्ये ठराविक कालावधीसाठी दरमहिना एक ठरलेली रक्कम जमा करावी लागते. कालावधी संपल्यानंतर मॅच्युरिटीची रक्कम व्यक्तीला परत दिली जाते.
5.8 टक्के व्याज (Post Office RD Interest Rate)
पोस्टाच्या आरडी खात्यात तुम्ही दरमहिना एक ठराविक रक्कम ठरलेल्या वेळी जमा करू शकता. या योजनेत 5.8 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते. हे व्याज दर तिसर्या महिन्यात कंपाऊंडिंग (Compounding Amount) होऊन जोडले जाते. योजनेत जेवढा जास्त वेळा होतो, तेवढा फायदा मिळतो. 100 रुपये महिना पासून पुढे कितीही रक्कमेचे आरडी खाते उघडू शकता. RD Account चा कालावधी सामान्यपणे सहा महिन्यांपासून 10 वर्षापर्यंत असतो. काही बँकांमध्ये आरडीसाठी किमान कालावधी 12 महिने आहे. (Post Office Saving Scheme)
अशी जाणून घ्या मॅच्युरिटीची रक्कम
आरडीत गुंतवणुकीद्वारे तुम्ही किती रक्कमेची बचत करू शकता हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे कॅलक्युलेटर आहेत. परंतु, एक सामान्य फॉर्म्युला आहे ज्याच्या मदतीने आरडीमध्ये मॅच्युरिटीच्या रकमेची गणना करू शकता –
A = P*(1+R/N)^(Nt)
A – मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम आहे.
P – आरडीमध्ये जमा केलेली रक्कम.
N – कंपाऊंडिंग फ्रीक्वेन्सी आहे.
R – व्याजदर आहे.
t – आरडी खात्याची कालावधी.
Web Title : Post Office Saving Scheme | post office saving schemes post office rd interest rate small saving schemes
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update