Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणुकीची फुल गॅरंटी, बँकेच्या अगोदर पैसे होतील डबल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Saving Scheme | जर तुम्हाला भविष्याची चिंता असेल तर तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय दुसरा पर्याय नाही. सध्या तुम्ही जोखमी (Risk) नुसार गुंतवणूक करू शकता. जर तुमच्यात जोखीम घेण्याची क्षमता जास्त असेल तर तुम्ही शेअर मार्केट (Share Market) किंवा म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करू शकता. सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. (Post Office Saving Scheme)

 

जर तुम्ही सुरक्षित आणि शून्य-जोखमीची गुंतवणूक शोधत असाल, तर पोस्ट ऑफिस बचत योजना (Kisan Vikas Patra) हा एक चांगला पर्याय असू शकतो. अल्पबचत (Small Savings) करणार्‍या लोकांसाठी पोस्ट ऑफिस (Post Office) ची किसान विकास पत्र एक उत्तम योजना आहे.

 

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर चक्रवाढ व्याज मिळते. यामुळे, ही योजना रिटर्नच्या पूर्ण हमीसह इतर पर्यायांपेक्षा जास्त फायदे देखील देते. या योजनेत गुंतवलेले पैसे 124 महिन्यांत दुप्पट होतात. (Post Office Saving Scheme)

 

किसान विकासपत्र Kisan Vikas Patra (KVP) म्हणजे काय?
जर तुम्ही या योजनेत 1 एप्रिल 2022 रोजी एकरकमी रक्कम (lump sum amount) जमा केली तर ती 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते. सध्या किसान विकास पत्रावर वार्षिक 6.9 टक्के चक्रवाढ व्याज उपलब्ध आहे.

 

ब्रँच ट्रान्सफरचा पर्याय
इंडिया पोस्ट (Indian Post) च्या वेबसाइटनुसार, किसान विकासपत्र (KVP) ची सुविधा देशातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसमध्ये मिळू शकते. तुम्ही यापैकी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किसान विकासपत्र खरेदी करू शकता.

 

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत खाते एका शाखेतून दुसर्‍या शाखेत ट्रान्सफर करण्याचीही सुविधा आहे. म्हणजेच काही कारणास्तव तुम्ही शहर बदलले तर तुम्ही ते नवीन शहरातील जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकता.

अडीच वर्षांनंतर केव्हाही काढता येते रोख रक्कम
ही योजना कोणत्याही FD पेक्षा जास्त रिटर्न देते. यासाठी मॅच्युरिटी कालावधी 124 महिने आहे, परंतु गरज भासल्यास तुम्ही तुमची गुंतवणूक त्यापूर्वीच कॅश करू शकता.

 

या योजनेत एकच अट आहे की ती 30 महिन्यांच्या लॉक-इन कालावधी (Lock-In Period) सह येते.
म्हणजेच, अडीच वर्षांच्या गुंतवणुकीनंतर तुम्ही किसान विकास पत्राची रोख रक्कम काढू शकता.

 

रिटर्नसह मिळते कर सूट
किसान विकास पत्रामध्ये पैसे गुंतवण्याचा आणखी एक फायदा आहे. ही योजना कर (Tax) सूट देखील प्रदान करते.
प्रातीकराच्या कलम 80सी अंतर्गत, किसान विकास पत्रामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर करातून सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

 

तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही किसान विकास पत्राचा लाभ घेऊ शकता.
यामध्ये सिंगल व्यतिरिक्त संयुक्त खाते उघडण्याचाही पर्याय आहे.

 

कमाल गुंतवणुक नाही मर्यादा
ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम (One Time Investment Scheme) आहे.
म्हणजेच दर महिन्याला किंवा दरवर्षी त्यात पैसे टाकण्याची गरज नाही.
यामध्ये तुम्ही किमान 1000 रुपये गुंतवू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

 

याचा अर्थ तुम्ही किसान विकास पत्रामध्ये एकावेळी कितीही रक्कम गुंतवू शकता. ही योजना 1988 मध्ये सुरू झाली.
आधी फक्त शेतकरीच यामध्ये गुंतवणूक करू शकत होते, पण नंतर ती सर्वांसाठी खुली करण्यात आली.

 

 

Web Title :- Post Office Saving Scheme | post office scheme kisan vikas patra money will be doubled in 124 months interest return tax benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! व्हेंटिलेटरवर एकही रुग्ण नाही तर ॲाक्सिजनवर केवळ एकच रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Kajal Aggarwal Sizzling Maternity Photoshoot | गरोदरपणात काजल अग्रवालनं केलं सिझलिंग फोटोशूट, काळ्या रंगाचा गाऊननं सोशल मीडियावर केला कहर

 

Devendra Fadnavis | 2 तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?, चौकशीनंतर फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…(व्हिडिओ)