खुशखबर ! पोस्ट ऑफिसमध्ये फक्त 10 रुपयांमध्ये उघडा ‘हे’ खाते, SBI पेक्षा मिळेल ‘दुप्पट’ व्याज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसच्या रेकरिंग डिपॉझिट अकाउंटमध्ये देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI च्या बचत खात्यापेक्षा दुप्पट व्याज मिळणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही केवळ 10 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
पोस्ट ऑफिसमध्ये जमा झालेल्या तुमच्या कमाईच्या प्रत्येक पैशाची सरकार हमी देते. त्यामुळे जर तुमची कमाई पोस्ट ऑफिसमध्ये जमा झाली असेल तर ती पूर्णपणे सुरक्षित आहे. सरकार पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये जमा केलेल्या पैशांचा उपयोग आपल्या कामांसाठी करते. त्यामुळे या पैशांवर संपूर्ण हमी दिली जाते. बँकांमध्ये जमा केलेली रक्कम CRR आणि SLR मध्ये ठेवली जाते आणि उर्वरित रक्कम सामान्य लोक किंवा कॉर्पोरेटला कर्ज म्हणून दिली जाते. कर्जामधून मिळालेल्या व्याजापासून बँका आपला व्यवसाय वाढवतात.
पोस्ट ऑफिस योजनेबद्दल –
SBI पेक्षा दुप्पट व्याज मिळत आहे. बचत खात्यावर सध्या एसबीआयचे 3.50 टक्के व्याज मिळते. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेत आवर्ती ठेवीवर म्हणजेच रेकरिंग डिपॉझिटवर (RD) 7.2 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. म्हणजे एसबीआयपेक्षा दुप्पट व्याज मिळते.
कोणत्याही पोस्टऑफिसमध्ये उघडा खाते –
पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खोलने खूप सोपे आहे. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही आरडी उघडू शकता. त्यामध्ये तुम्ही एक किंवा अधिक खाती उघडू शकता. हे खाते लहान मुलांच्या नावेही उघडता येते. 10 किंवा त्यापेक्षा अधिक वय असणारी मुले स्वतः हे खाते वापरू शकतात. तसेच आरडीमध्ये जॉईंट अकाउंटही उघडता येते.
आरडी योजनेचे फायदे –
आरडी गुंतवणूकदाराच्या बचतीवर अवलंबून असते आणि त्यात दरमहा निश्चित रक्कम गुंतवता येते.
आरडीच्या ‘लॉक इन फीचर’ नुसार सुरुवातीपासून अंतिम मुदतीपर्यंत व्याजदर समान राहतो. डिपॉझिटवर व्याजदर सुरुवातीला ‘लॉक इन’ होऊन जातो. म्हणजेच व्याजदर कमी असेल तर आरडीचा फायदा होतो.
आरडी मधील खाते उघडताना कालावधी निश्चित केली जाते. कालावधी पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला व्याजासहित रक्कम मिळते. आरडीची मुदत 10 वर्षांपर्यंत असू शकते. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक योजना बनविली जाऊ शकते.
ऑनलाईन ट्रॅक करू शकता –
पोस्ट खात्याने पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांसाठी मोबाइल बँकिंग सेवा सुरू केली आहे. याद्वारे आपण आपली रेकरिंग डिपॉझिट ऑनलाईन ट्रॅक करू शकता.
Visit : Policenama.com
- ‘हे’ सेवन केलंत तर डोकं चालेल जबरदस्त ! जाणून घ्या काय आहे यामध्ये –
- डोळ्यांची ‘ही’ लक्षणे ओळखली तर ‘या’ आजारांवर वेळीच करू शकता उपचार –
- डोळे आल्यास अशी घ्या काळजी, संसर्गापासून वाचण्यासाठी असे करा उपाय –
- आकर्षक फिगरसाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय, वजन होईल कमी –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- स्मार्टफोनचा अतीवापर केलात तर लवकर होऊ शकता म्हातारे, जाणून घ्या –
- गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा योग्य प्रमाणात, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार –
- पिळदार शरीरासाठी ‘हे’ आवश्य खा, असा करा या पदार्थाचा वापर –