बँकेच्या FD पेक्षाही पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत लवकर ‘डबल’ होतात पैसे ; जाणून घ्या काय आहे पोस्टाची ‘स्कीम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस नवनव्या योजना उपलब्ध करून देत असते. पोस्टात गुंतवलेले पैसेही चांगला परतावा मिळवून देतात. पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणली आहे. नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट्स ( NSC) असं या योजनेचं नाव असून या योजनेमध्ये फिक्स्ड डिपाॅझिट (FD)पेक्षाही अधिक पैसे मिळणार आहेत. सध्या सेव्हिंग बँकेचं व्याज हे ४ टक्क्यांनी सुरू होतं. तर NSC ८ टक्क्यांनी वार्षिक वाढ देत आहे. यात तुम्ही कितीही रुपयांची गुंतवणूक करू शकता.

अशी आहे योजना –

या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे. NSC योजनेत ८ % दराने वर्षाला व्याज मिळते . NSC स्माॅल सेविंग्समध्ये येतं आणि सरकार दर तीन महिन्यांनी स्माॅल सेव्हिंगसाठी व्याजदरात बदल करत असतं. कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. विशेष म्हणजे मुलांच्या नावावरही गुंतवणूक करता येऊ शकते.

बँकेपेक्षा मिळणार अधिक नफा –

उदा.८ % व्याज दरानं तुम्ही १ लाख रुपयांची NSC खरेदी कराल तर तुमचे पैसे ९ वर्षात दुप्पट होतील. हेच पैसे जर FD केले तर १०. ५ वर्षात दुप्पट होतील.

योजनेचे फायदे –

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला टॅक्स सेव्हिंगचा पर्याय उपलब्ध आहे. आयकर अधिनियम ८०सी नुसार तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळते. तसेच टीडीएसही कापला जात नाही. वेळेच्याआधी रक्कम काढता येईल. मात्र त्यासाठी पेनल्टी बसेल.

असे खोला खाते –

पोस्ट ऑफिसमध्ये नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट्स (NSC) सुरु करणे खूप सोपे आहे. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये NSC उघडू शकता. हे खाते लहान मुलांच्या नावेही उघडता येते.

आरोग्यविषयक वृत्त –

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक