पोस्टाच्या ‘या’ तीन योजनांमध्ये पैसे गुंतवा ; मिळवा मोठा नफा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयुष्यात प्रत्येकाला गुंतवणूक गरजेची असते. मात्र गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे गरजेचे आहे. अनेक बँकांकडून गुंतवणूकीवर आकर्षक व्याज दिले जाते. पोस्टात गुंतवणुक केल्यास ग्राहकांना चांगला फायदा मिळत आहे. पोस्टाने ग्राहकांसाठी तीन नवीन योजना आणल्या असून यामध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना चांगली रिटर्न देण्याची हमी देण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर अॅक्ट ८० सी नुसार करात सुट मिळू शकते.

बँक योजनेच्या तुलनेत सर्वाधीक फायदा पोस्ट ऑफिसच्या योनेत मिळणार आहे. बँकांच्या आणि पोस्टाच्या व्याज दराची तुलना केली तर एसबीआय ५ ते १० वर्षाच्या एफडीवर ६.६० टक्के व्याज देते. पोस्टात गुंतवणुक केल्यास ग्राहकास ७.६० टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. ग्राहकाने पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट किंवा चौपट मिळू शकतात.

१) पोस्ट ऑफिस टाईम डिपोजिट अकाऊंट (TD) योजना

पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवल्यास ग्राहकाला जास्तीत जास्त ७.८ टक्के व्याज दिले जाते. जर ग्राहकाने या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षानंतर ४ लाख ६० हजार रुपये ग्राकला दिले जातात.

२) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)योजना

पोस्टाच्या या योजनेमध्ये सध्या ८ टक्के व्याज मिळते. या योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यास वीस वर्षानंतर ८ टक्के व्याजाच्या हिशोबाने ४ लाख ८० हजार रुपये मिळतात. म्हणजेच २० वर्षात ग्राहकाला एक लाखावर ३ लाख ८० हजार रुपये व्याज पोस्टाकडून मिळणार आहे.

३) किसान विकास पत्र (KVP) योजना

किसान विकास पत्र या योजनेत सध्या ७.७ व्याज मिळत आहे. या योजनेत चार महिन्यांपासून ९ वर्षांपर्यंत पैसे गुंतवता येतात. गुंतवलेली रक्कम मॅच्योर झाल्यानंतर मिळणारी रक्कम पुन्हा या योजनेत गुंतवता येते. जर हे पैसे २० वर्ष गुंतवले तर मिळणारी रक्कम चौपटून अधिक मिळते.