पोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं, अन्यथा होणार मोठं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसने खातेदारासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ही घोषणा पोस्ट कार्यालयाच्या सेविंग अकाउंटमधील किमान शिल्लक रकमे संदर्भातील आहे. आता सेविंग अकाउंटमध्ये किमान रक्कम किती ठेवावी लागेल यासंदर्भात टपाल खात्याने ही माहिती सविस्तर सांगितली आहे.

आतापर्यंत आपल्याला बँकांमधील सेविंग अकाउंटमध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागत होती. आता ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यासाठीही हा नियम लागू करत आहे. या नुसार किमान रकमेच्या स्वरूपात पैसे ठेवणे अनिवार्य करण्यात आल आहे. तर पोस्ट विभागाच्या नियमानुसार बचत खातेदारांना महिन्यात किमान ५०० रुपये ठेवणे आवश्यक आहे. किमान शिल्लक रकमेचा नियम ११ डिसेंबरपासून लागू करण्यात आला आहे. जर ही रक्कम ठेवली नाही, तर खातेदाराच्या खात्यातून १०० रुपये देखभाल शुल्क आणि जीएसटी जोडून वजा केले जाणार आहेत.

पोस्ट ऑफिस बचत योजनेची वैशिष्ट्ये-
किमान ठेव रक्कम ५०० रुपये असावी.
किमान पैसे काढण्याची रक्कम ५० रुपये.
जास्तीत जास्त ठेव रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
खात्यात ५०० रुपयांहून कमी रक्कम असल्यास अशा खातेदारांना पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
आर्थिक वर्षात खात्यात ५०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा न झाल्यास देखभाल शुल्काच्या नावाखाली १०० रुपयांची कपात केली जाईल. संपूर्ण आर्थिक वर्षात ठेव शून्य रुपये राहिल्यास खाते बंद करण्यात येईल.
व्याजदर किमान शिल्लक रकमेच्या आधारावर निश्चित केले जाईल आणि त्याची मुदत महिन्याच्या १० व्या तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत असेल.
जर खात्यात किमान शिल्लक रक्कम महिन्याच्या १० तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ५०० रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर व्याज दिले जाणार नाही.
अर्थमंत्र्यांच्या माहितीनुसार व्याजदर निश्चित केले जाणार असून, तो आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात जमा होईल.
प्राप्तिकर (Income tax) कलम 80TT अंतर्गत सर्व बचत खात्यांवरील १० हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही कर आकारला जाणार नाही.
जर आपण सलग ३ वर्षे सेव्हिंग बँक खात्यातून पैसे काढणे,जमा करणे असे व्यवहार केले नाहीत, तर ते निष्क्रिय खाते म्हणून समजले जाईल. असे खाते पुन्हा सुरू करण्यासाठी KYC करावे लागेल. त्यांच्या संबंधित पोस्ट ऑफिसमधून पासबुकचे नूतनीकरण करावे लागेल.

पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्याची नियमावली-
प्रत्येक व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये एकच खाते उघडू शकते. बचत खात्यावर ४ % व्याज मिळते.
एकल व्यक्ती एकल किंवा संयुक्त खाते म्हणून बचत खाते उघडू शकते.
१० वर्षांपेक्षा कमी वयाचे मुलं, मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनाही खाते उघडता येते.

असे उघडा पोस्टात खाते-
पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी इंटरनेट बँकिंग (Internet banking)आणि मोबाइल बँकिंग (Mobile banking) सुविधा उपलब्ध आहे. इंटरनेट बँकिंग ही बँकांप्रमाणेच एक पद्धत आहे. इंटरनेट बँकिंगसाठी प्रथम आपल्याला इंडिया पोस्ट इंटरनेट बँकिंगवर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर नेव्हिगेट अकाउंट्स पर्यायावर क्लिक करा. नंतर शिल्लक आणि व्यवहार माहितीवर क्लिक करा. त्यानंतर बचत खात्यावर जाऊन, माय ट्रान्झॅक्शन पर्यायावर क्लिक करा. आणि शेवटी आपला तपशील डाऊनलोड करा.