पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांना 11 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे लागेल ‘हे’ काम; अन्यथा खाते बंद होईल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण पोस्ट ऑफिस (post office)मध्ये खातेधारक असाल, तर आपल्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. यंदा पोस्ट ऑफिस(post office) खात्यात 11 डिसेंबरपर्यंत किमान शुल्क ठेवणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिस खात्यात किमान 500 रुपये ठेवणे बंधनकारक आहे. इंडिया पोस्टने आपल्या ग्राहकांना याविषयी आधीच माहिती दिली आहे. या माहितीनुसार, पोस्ट ऑफिस खातेधारकांकडे आपल्या खात्यात किमान 500 रुपये मेंटेन करण्यासाठी 12 दिवसांचा कालावधी आहे.
आपल्या बचत खात्याच्या ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये इंडिया पोस्टने म्हटले आहे की, ‘पोस्ट ऑफिस बचत खात्यात आता किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. जर आपणास मेंटेनस चार्ज भरायचा नसेल तर 11 डिसेंबर 2020 पूर्वी तुमच्या खात्यात 500 रुपये नक्कीच ठेवा.
डाक घर बचत खाता में न्यूनतम अधिशेष रखना हुआ अनिवार्यl#MyPostIndiaPost pic.twitter.com/f2cef2q6lS
— India Post (@IndiaPostOffice) November 28, 2020
काय आहे सध्याचा नियम?
इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात किमान 500 रुपये न ठेवल्यास 100 रुपये देखभाल फी म्हणून वजा केली जाईल. जर खात्यात शिल्लक नसेल तर ते आपोआप बंद होईल.
पोस्ट ऑफिस बचत खाते कोणत्याही प्रौढ व्यक्तीद्वारे वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे उघडता येते. अल्पवयीन मुलांसाठी त्यांचे पालकदेखील त्यांच्या नावावर खाते उघडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या नावे केवळ एक पोस्ट ऑफिस सेव्हिंग खाते उघडता येते. हे खाते उघडताना नामनिर्देशन अनिवार्य आहे.
व्याज दर
सध्या वैयक्तिक आणि संयुक्त पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4 टक्के दराने व्याज मिळते. या खात्यावर प्राप्त व्याजाची गणना 10 तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या किमान शिल्लक आधारे केली जाते. पोस्ट ऑफिस वेबसाइटनुसार, या कालावधीत जर खात्यात शिल्लक 500 रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.